मंत्रिमंडळात शिंदे गटातून पूजा चव्हाण मृत्यू प्रकरणात गंभीर आरोप झालेल्या आमदार संजय राठोडांचा समावेश झाल्याने जोरदार टीका होत आहे. या प्रकरणात देवेंद्र फडणवीस, चिंत्रा वाघ यांच्यासह भाजपाच्या अनेक नेत्यांनी तत्कालीने ठाकरे सरकारला धारेवर धरलं होतं. आता त्याच राठोडांना आपल्या मंत्रिमंडळात घेतल्याने विरोधक आक्रमक झालेत. यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी स्पष्टकरण देत आपली भूमिका मांडली.
एकनाथ शिंदे म्हणाले, “महाविकासआघाडी सरकारच्या काळात पोलिसांनी संजय राठोड यांना क्लीन चिट दिली होती. यानंतरही कुणाचे काही विचार असेल, म्हणणं असेल तर नक्की सांगा, ते ऐकून घेतलं जाईल. लोकशाहीत प्रत्येकाला भावना व्यक्त करण्याचा अधिकार आहे.”
“…म्हणून राठोडांचा मंत्रिमंडळात समावेश”
“सर्वांना माहिती आहे की, पोलिसांनी त्या प्रकरणाचा तपास केला. त्या तपासात काहीच निष्पन्न झालं नाही. त्यामुळे त्यांना क्लीन चिट देण्यात आली. म्हणून राठोडांचा मंत्रिमंडळात समावेश झाला आहे,” असं एकनाथ शिंदे यांनी सांगितलं.