Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

Maharashtra Cabinet : एकनाथ शिंदे- देवेंद्र फडणवीस मंत्रिमंडळाचा शपथविधी संपन्न, एकूण 18 मंत्र्यांनी शपथ घेतली.

Maharashtra Cabinet
, मंगळवार, 9 ऑगस्ट 2022 (12:06 IST)

मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री राजभवनात दाखल

मंगलप्रभात लोढा यांनी घेतली शपथ
भाजपचे ज्येष्ठ नेते मंगलप्रभात लोढा यांनी शपथ घेतली आहे.
 
शंभूराज देसाई यांनी शपथ घेतली
उद्धव ठाकरे यांच्या मंत्रिमंडळात गृहराज्यमंत्री असलेल्या शंभूराज देसाई यांनी शपथ घेतली.
webdunia

अतुल सावे यांनीही घेतली शपथ
औरंगाबादचे आमदार अतुल सावे यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली आहे. मराठवाड्याला तीन मंत्रिपदं गेली आहेत.
 
शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर यांनी घेतली शपथ
शिवसेनेचे सावंतवाडीचे आमदार दीपक केसरकर यांनी शपथ घेतली आहे. ते शिंदे गटाचे प्रवक्ते म्हणून ओळखले जातात. ते कायम या गटाची भूमिका हिरिरीने मांडतात.

अब्दुल सत्तार यांचा मंत्रिमंडळात अखेर समावेश
अब्दुल सत्तार यांचा मंत्रिमंडळात समावेश करण्यात आला आहे. टीईटी घोटाळ्यात त्यांच्या मुलीचं नाव आल्याने त्यांच्या सहभागावर प्रश्नचिन्ह होतं.
webdunia
रविंद्र चव्हाण यांचाही समावेश
शिवसेना आमदार रविंद्र चव्हाण यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली आहे. ते कल्याण डोंबिवलीचे आमदार आहेत. आधी ते राज्यमंत्री आहेत.

तानाजी सावंत यांनी घेतली शपथ
शिवसेनेचे आमदार तानाजी सावंत यांनीही मंत्रिपदाची शपथ घेतली आहे.
 
उदय सामंत यांनी घेतली शपथ
माजी उच्चतंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली आहे. ते अगदी शेवटच्या क्षणी शिंदे गटात सामील झाले होते. ते आधी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये होते.

संदिपान भुमरे यांचा शपथविधी
शिंदे गटाचे संदिपान भुमरे यांनीही मंत्रीपदाची शपथ घेतली आहे. ते पैठणचे आमदार आहेत.
 
सुरेश खाडे यांनी घेतली शपथ
मिरजेचे आमदार सुरेश खाडे यांनी शपथ घेतली आहे. हा आमचा सन्मान आहे अशी प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केली.

शिंदे गटाचे पहिले आमदार म्हणून गुलाबराव पाटलांची शपथ
शिवसेना नेते गुलाबराव पाटील यांनी शपथ घेतली आहे. शिंदे गटाचे शपथ घेणारे ते पहिले मंत्री आहेत. ते चित्तथरारक पणे गुवाहाटीला पोहोचले होते.  
 
गिरीश महाजन यांनी घेतली शपथ
भाजप नेते गिरीश महाजन यांनी शपथ घेतली आहे. ते उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे निकटवर्तीय मानले जातात. ते याआधीही मंत्री होते.
 
चंद्रकांत पाटील यांचाही शपथविधी
भाजप नेते चंद्रकांत पाटील यांनी शपथ घेतली आहे. त्यांच्याविषयी इथे माहिती वाचा.
 
सुधीर मुनगंटीवार यांची पुन्हा मंत्रिपदी वर्णी
भाजपचे ज्येष्ठ नेते सुधीर मुनगंटीवार यांनी पुन्हा मंत्रिपदाची शपथ घेतली आहे. गेल्या सरकारमध्ये ते वनमंत्री होते. ते बल्लारपूर मधून आमदार आहेत.
 
राधाकृष्ण विखे पाटील यांनी घेतली शपथ
राधाकृष्ण विखे पाटील यांनी सर्वप्रथम मंत्रिपदाची शपथ घेतली. विखे पाटील पूर्वाश्रमीचे काँग्रेसवासी आहेत. 2019 च्या विधानसभेच्या निवडणुकीच्या वेळी ते भाजपत दाखल झाले. 2014 मध्ये ते विरोधी पक्ष नेते होते.
राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचं आगमन
राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांचं आगमन झालं असून आता शपथविधीला सुरुवात होईल. तब्बल 14 मिनिटे उशीरा शपथविधी सुरू होत आहे.
 
एकही महिला नाही
आज शपथ घेणाऱ्या मंत्र्यांमध्ये एकही महिला नाही.
webdunia


शपथविधीसाठी राजभवन सज्ज
थोड्याच वेळात होणाऱ्या शपथविधीसाठी राजभवन सज्ज झालं आहे.
 
Maharashtra Cabinet : एकनाथ शिंदेंची शिवसेना राजभवनाकडे रवाना
महाराष्ट्रात मंत्रिमंडळ विस्ताराला अजूनही काहीसा विलंब आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आपल्या आमदारांच्या गटासह राजभवनाकडे रवाना झाल्याचे वृत्त आहे. शपथविधीपूर्वी त्यांनी आमदारांचीही भेट घेतली होती. भाजप आणि शिंदे कॅम्पचे 9-9 मंत्री शपथ घेऊ शकतात.
 

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस राजभवनात दाखल झाले असून थोड्याचवेळात शपथविधीला सुरुवात होत आहे. शपथविधीला अनेक महत्त्वाचे नेते उपस्थित आहेत.
 

संजय राठोड यांचीही मंत्रिमंडळात वर्णी

शिवसेनेचे नेते संजय राठोड यांचीही मंत्रिमंडळात वर्णी लागली आहे. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना त्यांना राजीनामा द्यावा लागला होता. पूजा चव्हाण या मुलीच्या मृत्यूला जबाबदार असल्याचा आरोप त्यांच्यावर होता. यावेळी मंत्रिमंडळात समावेश झाल्यावर त्यांनी प्रसारमाध्यमांना कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही.

Maharashtra Cabinet : मंत्रिपदाच्या आशेवर असलेले मुंबई भाजप अध्यक्ष  
मुंबई भाजपचे अध्यक्ष मंगल प्रभात लोढा म्हणाले की, मला आशा आहे की मला काही जबाबदारी दिली जाईल. मला महाराष्ट्रातील जनतेची सेवा करण्याची संधी दिल्याबद्दल मी पंतप्रधान, गृहमंत्री, जेपी नड्डा आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आभार मानू इच्छितो. मला राज्य मंत्रिमंडळात स्थान मिळेल असे वाटते.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

Google Down गुगल डाऊन !