Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

देवेंद्र फडणवीसांचं युतीबद्दल मोठं विधान, 'लोकसभा निवडणूक शिवसेना-भाजप एकत्र लढणार

devendra fadnavis
, रविवार, 7 ऑगस्ट 2022 (16:16 IST)
Devendra Fadnavis on loksabha election 2024 : उपमुख्यमंत्री सध्या दिल्लीत आहे. त्यावेळी त्यांनी आगामी लोकसभा निवडणुकीबद्दल महत्वाची माहिती देत माध्यमांशी संवाद साधला. या वेळी आगामी लोकसभा निवडणूक भाजप -शिवसेना एकत्र लढणार अशी माहिती दिली. 16 मतदारसंघावर भाजपने लक्ष केंद्रित केल्याची माहिती त्यांनी दिली. मंत्री मंडळ विस्ताराबाबत बोलताना त्यांनी सांगितले की, सर्वोच्च न्यायालयाने ''मंत्रिमंडळाचा विस्तार करू नका असे कुठंही म्हटले नाही. आम्ही लवकरच मंत्रिमंडळाचा विस्तार करणार आहोत. त्या सुनावणीच्या आणि मंत्रिमंडळाच्या विस्ताराचा काहीही संबंध नाही. लवकरच आम्ही मंत्रिमंडळाचा विस्तार करू. 
मुख्यमंत्र्यानी सध्या मंत्रिमंडळाचा विस्तार होई पर्यंत सर्व सुनावणी घेण्याचे अधिकार सचिवांना दिल्यावरून विरोधकांकडून शिंदे सरकारच्या विरोधात टीका केली जात आहे. या वर फडणवीस म्हणाले की "गेल्या सरकारमध्ये अनेक सचिवांना ते अधिकार होते. त्यापूर्वीच्या आमच्या सरकारमध्येही अनेक मंत्र्यांनी सचिवांना ते अधिकार दिले होते. ही महाराष्ट्रात नाही, देशात परंपरा आहे. अर्धन्यायिक प्रकरणाचे सुनावणीचे अधिकार सचिवांना दिले जातात. बाकी कुठलेही अधिकार दिलेले नाहीत. सरकार जनतेचं आहे. जनतेचे मुख्यमंत्री आहेत. मी त्यांच्यासोबत मंत्रिमंडळात आहे. जनतेचे लोकच मंत्रिमंडळाचे निर्णय घेतील."
 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

Russia Ukraine Crisis : युक्रेनमधील रशियन-व्याप्त अणुऊर्जा प्रकल्पावर गोळीबार