राज्यात सध्या पावसाने पुन्हा जोर धरला आहे. राज्यात मान्सूनचा कमी दाबाचा पट्टा दक्षिणेकडे सरकला असून राजस्थान ते पूर्व बंगालच्या उपसागरापर्यंत विखुरला आहे. हवामान खात्यानं पश्चिम महाराष्ट्र व कोकणात मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. राज्यातील कोकण व मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. हवामान खात्यानं दक्षिण कोकणात जोरदार तर मध्य मराठवाड्यात विजांच्या कडकडाटासह जोरदार मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
सध्या राज्यात गेल्या दहा ते बारा दिवसांपासून उघडीप दिलेल्या पावसाने पुन्हा जोर धरला आहे. राज्यात पुन्हा पुढील पाच दिवस मान्सून सक्रिय होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. राज्यात पुढील चार ते पाच दिवस कोकण व मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी जोरदार पावसाचा सरी बरसतील तर किनारपट्टीलगत सोसाट्याचे वारे वाहणार. मराठवाड्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता आहे.
येत्या 24 तासांत दक्षिण कोकण, दक्षिण मध्य महाराष्ट्र आणि विदर्भाच्या काही भागांत मेघगर्जनेसह मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे.अशी माहिती हवामान खात्यानं ट्विट करून दिली आहे. रायगड, धुळे, नाशिक, नंदुरबार, पुणे, जळगाव, औरंगाबाद, जालना, नागपूर, बुलढाणा, गोंदिया आणि भंडारा या जिल्ह्याना यलो अलर्ट सांगण्यात आला आहे.