Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

Dhule :धुळ्यात बस चालकाची गळफास घेऊन आत्महत्या

Dhule :धुळ्यात बस चालकाची गळफास घेऊन आत्महत्या
, रविवार, 7 ऑगस्ट 2022 (12:29 IST)
धुळ्यात एसटी बस डेपो चालकाने धुळ्याच्या मुख्य मध्यवर्ती बस स्थानकात बस मध्ये लागलेल्या दोरीच्या साहाय्याने गळफास घेत आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. हिरामण नाथा देवरे(57,रा.पुणे) असे या मयत बस चालकाचे नाव आहे. ही पुणे -धुळे बस पुण्यातील शिवाजीनगर डेपोची असून शनिवारी सायंकाळी 6:30 वाजेच्या सुमारास 
धुळ्याच्या मध्यवर्ती बस स्थानकात दाखल झाली. नंतर चालक देवरे यांनी बस वाहकासोबत जेवण केल्यावर वाहक बस स्थानकातील विश्रामगृहात झोपण्यासाठी गेले असता चालक देवरे यांनी पुणे-धुळे बस मध्ये बेल वाजवायच्या दोरीच्या साहाय्याने रात्री 10 :30 च्या सुमारास गळफास घेत आत्महत्या केली.

आत्महत्येचे कारण अद्याप समजू शकले नाही. घटनेची माहिती मिळतातच एसटी महामंडळाचे अधिकारी आणि पोलीस अधिकारी घटनास्थळी पोहोचले आणि देवरे यांचे मृतदेह ताब्यात घेऊन तपासणीसाठी जिल्ह्या रुग्णालयात दाखल केले असून या घटनेची अकस्मात मृत्यू म्हणून नोंदणी करण्यात आली आहे. पुढील तपास पोलीस करत आहे. 
 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

Rain Update Alert : राज्यात मुसळधार पावसाचा इशारा