rashifal-2026

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

ST Driver Suicide In Ahmadnagar : बस आगारात बस चालकाची गळफास घेऊन आत्महत्या

ST Driver Suicide In Ahmadnagar: Bus driver commits suicide by strangulation in bus depotST  Driver  Suicide In Ahmadnagar :  बस आगारात बस चालकाची गळफास घेऊन आत्महत्या  Maharashtra News Regional Marathi News  In Webdunia Marathi
, शुक्रवार, 29 ऑक्टोबर 2021 (09:53 IST)
सध्या एसटी कर्मचाऱ्यांचे आत्महत्येचे सत्र सुरूच आहे. गेल्या महिन्यात देखील अहमदनगरच्या एका एसटी कर्मचाऱ्याने आत्महत्या केली होती. आज पुन्हा अहमदनगर जिल्ह्यातील शेवगाव येथील परिवहन महामंडळाच्या चालकाने बस आगारात उभीं असलेल्या एका एसटी बसला गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे खळबळजनक वृत्त मिळाले आहे. दिलीप हरिभाऊ काकडे असे या मयत बसचालकाचे नाव आहे. काकडे हे परिवहन महामंडळ मध्ये बस चालक म्हणून होते. आत्महत्येचे कारण अद्याप कळू शकले नाही. ही घटना शुक्रवारी सकाळी घडली आहे. बस आगारात उभारलेल्या एका बस मध्ये काकडे यांनी गळफास घेऊन आपले आयुष्य संपविले. घटनेची माहिती मिळतातच आगारचा कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. तसेच अधिकाऱ्यांनी देखील दखल घेतली आणि पोलिसांना कळविले. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठविले आहे. 
एसटी कर्मचाऱ्यांना 28 टक्के महागाई भत्ता आणि बवाढिव घरभाडे भत्ता देण्याचे मान्य करण्यात आले आहे. शासकीय कर्मचाऱ्यां प्रमाणे एसटी कर्मचाऱ्यांनाही 28 टक्के महागाई भत्ता मिळण्याचे परिवहन मंत्री आणि एसटी महामंडळाचे अध्यक्षअनिल परब यांनी घोषणा केली आहे. काकडे यांनी आत्महत्या केल्याचे कारण अद्याप समजू शकले नाही. पोलीस तपास करत आहे.   
 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

फेसबुकचे नाव बदलले 'मेटा' नावाने ओळखला जाणार, सीईओ मार्क झुकरबर्ग यांनी घोषणा केली