नाशिकच्या प्रख्यात त्र्यंबकेश्वर मंदिरात तैनात असलेल्या तीन सुरक्षा रक्षकांनी रविवारी सकाळी दोन भाविकांना मारहाण केल्याची घटना घडली आहे.
सदर घटना रविवारची असून त्रयंबकेश्वर मंदिरात असलेल्या तीन सुरक्षा रक्षकांनी दोन भाविकांना मारहाण केली महिलेच्या मुलाला धक्काबुक्की करून आणि तिच्याशी गैरवर्तन केले.काही पायऱ्यांवरून खाली पडून तिच्या डोक्याला दुखापत झाल्याचा असा आरोप एका 60 वर्षीय महिलेने केला आहे.पीडितेच्या तक्रारीवरून पोलिसांनी या प्रकरणी तीन सुरक्षा रक्षकांविरुद्ध एफआयआर दाखल केला आहे.
त्र्यंबकेश्वर पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्याने सांगितले की, रविवारी सकाळी त्र्यंबकेश्वर मंदिरात ही घटना घडली. रविवार आणि विकेंड असल्यामुळे भाविकांची मंदिरात मोठ्या प्रमाणात गर्दी होती. मंदिरात देवाची पूजा करत असताना एका सुरक्षा रक्षकाने एका महिलेच्या मुलाला धक्काबुक्की केली आणि तिच्याशी गैरवर्तन केले.
तसेच मंदिराच्या बाहेर येऊन देखील काही सुरक्षारक्षक आले आणि तिच्या आणि तिच्या मुलासोबत गैरवर्तन केल्याचा आरोप महिलेने केला.
महिलेच्या तक्रारीच्या आधारे भारतीय दंड संहितेच्या कलम 323 (स्वैच्छिकपणे दुखापत करणे), 504 (शांतता भंग करण्याच्या हेतूने हेतुपुरस्सर अपमान) आणि 506 (गुन्हेगारी धमकावणे) अंतर्गत तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस प्रकरणाचा पुढील तपास करत आहे.