नाशिक शिक्षक मतदारसंघ निवडणूक जवळ आली आहे. नाशिकच्या जागेवर महाविकास आघाडी कडून संदीप गुळवे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. संदीप हे उमेदवारी अर्ज दाखल करणार आहे. तर दुसरी कडे महायुतीत नाशिक जागेवरून गोंधळ सुरु असून शिवसेना एकनाथ शिंदे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटातील उमेदवारांना एबी फॉर्म मिळाल्याचे दावा करण्यात आला आहे. अजित पवार गटाकडून महेंद्र भावसार यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. तर शिंदे गटाकडून किशोर दराडे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. महायुतीच्या दोन्ही पक्षाकडून स्वतंत्र उमेदवार दिल्याने खळबळ उडाली आहे.
नाशिक शिक्षक मतदार संघ साठी उमेदवार आज अर्ज दाखल करत आहे. तर भाजपचे धनराज विसपुते हे देखील निवडणुकीसाठी उमेदवार आहे. विसपुते यांनी नाशिक पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत अपक्ष उमेदवारीसाठी अर्ज भरला होता. आता ते नाशिक शिक्षक मतदार संघाचे उमेदवार म्हणून अर्ज दाखल करत आहे. त्यामुळे महायुती कडून तिन्ही उमेदवार अर्ज दाखल करण्याची चर्चा सुरु आहे.
तर या उमेदवारीसाठी भाजपचे अजून दोन नेते विवेक कोल्हे आणि महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचे भाऊ राजेंद्र विखे यांनी देखील अर्ज दाखल केला आहे त्यामुळे आता भाजपकडून तीन उमेदवार नाशिक शिक्षक मतदार संघाच्या निवडणुकीसाठी इच्छुक आहे. तसेच अजित पवार गटाकडून आणि शिंदे गटाकडून देखील उमेदवार अर्ज दाखल करण्यासाठी इच्छुक असल्यामुळे महायुतीत चांगलाच गोंधळ सुरु आहे.