Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

एनडीआरएफच्या निकषानुसार मदत दिली जाणार

एनडीआरएफच्या निकषानुसार मदत दिली जाणार
, बुधवार, 28 जुलै 2021 (21:40 IST)
राज्यातील पूर परिस्थितीमुळे झालेल्या नुकसानीचा आढावा मंत्रिमंडळ बैठीकत घेण्यात आला. या बैठकीत पूरग्रस्त भागातील नुकसानग्रस्तांच्या मदतीसंदर्भातही निर्णय घेतला गेला आहे. त्यानुसार आता सुरूवातीला एनडीआरएफच्या निकषानुसार तातडीची मदत दिली जाणार आहे. राज्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी माध्यमांशी बोलताना याबाबत माहिती दिली आहे.
 
एकनाथ शिंदे म्हणाले की, आता सुरूवातील तातडीची मदत म्हणून दहा हजार रुपये रोखीने मदत देण्याचा निर्णय झाला आहे आणि उर्वतरीत मदत एनडीआरएफच्या निकषांप्रमाणे घराचं किंवा आणखी काही नुकसान असेल, ही सगळी मदत एनडीआरएफच्या निकषानुसार दिली जाईल.
 
तसेच, नुकसानीचे एकूण आकडेवारी आल्यानंतर व पूर्ण आढावा आल्यानंतर अधिकची मदत देण्याबाबत निर्णय घेण्यासंदर्भात  बैठकीत चर्चा झाली आहे. अशी देखील एकनाथ शिंदे यांनी माहिती दिली आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

जयंत पाटील यांच्यावर ब्रीच कॅण्डीत उपचार सुरू