Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

पैशांचा पाऊस पाडण्याचे आमिष दाखवून युवतीवर अत्याचार

पैशांचा पाऊस पाडण्याचे आमिष दाखवून युवतीवर अत्याचार
, मंगळवार, 17 ऑगस्ट 2021 (22:12 IST)
नाशिकमध्ये गेल्या काही दिवसांपासून अंधश्रध्येच्या विळख्यात नागरिकांना अडकवून त्यांना लुबाडण्या बरोबरच महिलांवर अत्याचार करण्याच्या घटना समोर येत आहे,अशीच एक घटना पुन्हा गंगापूर गावात समोर आली आहे. पैशांचा पाऊस पाडण्याचे आमिष दाखवत सत्तावीस वर्षीय युवतीवर वारंवार अतिप्रसंग केल्‍याची धक्‍कादायक घटना उघडकीस आली आहे. शहराला लागून असलेल्‍या गंगापूर गाव परीसरात हा प्रकार घडला आहे. यासंदर्भात पीडीतेने पोलिस ठाण्यात फिर्याद दिली असून या प्रकरणी धक्कादायक खुलासा केला आहे.
 
पैश्‍यांचा पाऊस पाडण्यासाठी संशयितांनी पिडीतेला प्रत्‍येक बुधवारी पूजा करण्यास सांगितले. त्‍यानुसार गंगापूर गावातील पठाडे गल्‍ली येथील जामा मस्‍जीदच्‍या शेजारी असलेल्‍या पत्र्याच्‍या घरात तिला डिसेंबर २०२० च्‍या तिसऱ्या आठवड्यात बोलविण्यात आले. घटनेतील संशयित काममिल गुलाम यासिन शेख याने पैश्‍याचा पाऊस पाडण्याचे खोटे आश्‍वासन देतांना पूजेच्‍या बहाण्याने पीडीतेला निवस्‍त्र केले.
 
खोटी पुजा मांडून ओठाने मंत्र पुटपुटत मंत्र म्‍हणून पीडीतेच्‍या अंगावरुन नारळाचा उतारा करत इच्‍छेविरुध्द शरीर संबंध प्रस्‍थापित केले.  या कृत्‍यासाठी संशयित शेखसह अन्‍य दोघे संशयित फर्नांडिस व भुजबळ यांनी मदत केल्‍याने त्‍यांच्‍या विरोधात गंगापूर पोलिस ठाण्यात गुन्‍हा दाखल करण्यात आला आहे. या तिघा संशयितांना पोलिसांनी ताब्‍यात घेतले आहे.
 
पीडीतेने दिलेल्‍या फिर्यादित म्‍हटले आहे, की गेल्‍या १३ डिसेंबर २०२० पासून ९ जानेवारी २०२१ या कालावधीत संशयितांनी पैश्‍यांचा पाऊस पाडण्याचे आमिष दाखवतांना इच्‍छेविरुद्ध शरीर संबंध प्रस्‍थापित केले. यासंदर्भात पीडीतेने गंगापूर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली असून, घटनेतील तिघा संशयितांना पोलिसांनी बेड्या ठोकल्‍या आहेतकामिल गुलाम यासिन शेख (वय २९, रा. लालगंज ता.दालकोटा, जि. उत्तर प्रदेश जनाजपुर, पश्‍चिम बंगाल व सध्या जामा मशीद समोर पठाडे गल्ली, गंगापूर गाव), स्‍टॅलीस्‍टींग उर्फ शिवराम जेम्‍स फर्नांडिस (वय ५६, मुळ रा. जंगारेस्‍टयुड्डू जि. पश्‍चिम गोदावरी, आंध्रप्रदेश व सध्या कमलनगर, कामठवाडा, नाशिक) व अशोक नामदेव भुजबळ (वय ६३, रा.राधाकृष्णनगर, सातपूर) असे अटक केलेल्‍या तिघा संशयितांची नावे आहेत.
 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

मोदींना चक्क देवाचा दर्जा देत त्यांचे छोटेखानी मंदिर उभारले