कोरोना अजून संपला नाही, ही गोष्ट वारंवार समोर येत असल्यामुळे लोकांच्या मनातील भीती देखील कायम आहे. याचदरम्यान आता एक धक्कादायक घटना समोर आली आहे. यात एका 40 वर्षाच्या व्यक्तीनं आणि त्याच्या पत्नीनं कोरोनाची लक्षणं दिसताच भीतीनं आत्महत्या केली आहे. ही घटना कर्नाटकातील आहे.
मंगळुरु पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आत्महत्या करण्याआधी या दाम्प्त्यानं पोलिसांना एक व्हॉईस मेसेजही पाठवला होता. या मेसेजमध्ये दाम्प्त्यानं म्हटलं होतं, की मीडियामध्ये कोरोना व्हायरसंदर्भात येणाऱ्या बातम्यांमुळे ते घाबरले असून याच कारणामुळे ते आपलं जीवन संपवत आहेत. यानंतर पोलीस कमिशनरनं या जोडप्याला कोणतंही चुकीचं पाऊल न उचलण्याचा सल्ला दिला होता.
या महिलेच्या आईने यांच्याशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला पण दोघांनीही फोन उचलला नाही. यानंतर तिच्या आईने या अपार्टमेंटमधील राहणाऱ्या तिच्या मैत्रिणीला फोन केला आणि तपास करायला लावला. ही मैत्रीण घरी पोहोचली असता दरवाजातून लावलेला होता अनेक वेळ दरवाजा वाचून सुद्धा दरवाजा उघडण्यास कोणी आले नाही. म्हणून दरवाजा तोडण्यात आला आणि त्यावेळी महिलेचा मृतदेह लिविंग रूम मध्ये आढळला तर तरुणाचा मृतदेह स्वयंपाक घरात सापडला. यानंतर त्यांना त्वरित शासकीय रुग्णालय हलविण्यात आले परंतु डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्ये असे दिसून आले की त्यांनी स्वतः विषप्राशन केले होते.
या दांपत्याला तीन महिन्यात दोन वेळा कोरोना विषाणूचा संसर्ग झाला. यामुळे या विषाणूच्या नैराश्यातून या दोघांनी आत्महत्या केली. या जोडप्याची ओळख रमेश आणि गुना आर सुवर्णा अशी पटली आहे. ते मंगळुरुमधील अपार्टमेंटमध्ये राहत होते. माहितीनुसार, दोघांमध्येही गेल्या काही दिवसांपासून कोरोनाची लक्षणं दिसत होती. मंगळुरु पोलिसांनी अशी माहिती दिली, की आत्महत्या करण्याआधी या जोडप्यानं पोलीस कमिशनरला व्हॉईस मेसेज पाठवला होता.
पोलीस जोपर्यंत या जोडप्याच्या अपार्टमेंटमध्ये पोहोचले तोपर्यंत त्यांनी आत्महत्या केलेली होती. अपार्टमेंटमध्ये महिलेनं लिहिलेली एक सुसाईड नोटही मिळाली. यात तिनं आपल्या तेरा दिवसांच्या बाळाच्या मृत्यूबद्दलही लिहिलं होतं आणि यामुळेही ती दुःखी असल्याचं तिनं सांगितलं होतं. यात हेदेखील लिहिलं होतं, की महिलेला मधुमेहाचाही भरपूर त्रास आहे. तिला दिवसाला इन्सुलिनचे दोन इंजेक्शन घ्यावे लागत होते.