Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

मुख्यमंत्र्यांना बुके देणे पडले महागात, झाला दंड

मुख्यमंत्र्यांना बुके देणे पडले महागात, झाला दंड
राज्यात प्लास्टीक बंदी असताना मुख्यमंत्र्यांना कार्यकर्त्यांकडून प्लास्टीकमध्ये गुंडाळून बुके दिला गेला. त्यावेळी औरंगाबादचे मनपा आयुक्त आस्तिककुमार पांडे यांच्या ते निदर्शनास आलं आणि लागलीच त्या कार्यकर्त्यांना प्रत्येकी ५०० रु. दंड ठोठावला. हे दोन्ही कार्यकर्ते मुख्यमंत्र्यांना भेटायला जालन्याहून आले होते.
 
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे पहिल्यांदाच मराठवाड्यात औरंगाबादेत आले होते, त्यावेळी काही कार्यकर्त्यांनी मुख्यमंत्र्यांच्या स्वागताला फुलांचे बुके आणले होते, त्यावेळी काही बुके मध्ये प्लास्टीक असल्याचं मनपा आयुक्त आस्तिक कुमार पांडे यांच्या निदर्शनास आलं. याआधी बीडचे येथून औरंगाबादला बदली झाली होती तेव्हा देखील त्यांनी एका अधिकाऱ्याला पाच हजाराचा दंड लावला होता. 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

निर्भया बलात्कार प्रकरण : फाशीचे लाईव्ह प्रसारण करा