औरंगाबादमध्ये पडेगाव इथल्या मदरशात 12 वर्षीय मुलगा गंभीर जखमी झाला आहे. या मुलाने तोंडात बॅटरी पकडली होती. त्याचवेळी हा स्फोट झाला.
या स्फोटामुळे मुलाच्या चेहऱ्यावर गंभीर इजा झाली आहे. या मुलावर औरंगाबादच्या घाटी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. यापूर्वी मोबाईल चार्जिंग लावून बोलत असताना स्फोट झाल्याच्या अनेक घटना घडल्या आहेत.