गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्या बैठकीला पवानगी मिळणार की नाही या प्रश्नाचे उत्तर दिलं आहे. या संदर्भात एक दोन दिवसांमध्ये औरंगाबाद पोलीस आयुक्त निर्णय घेतील. ते त्यांच्या सगळ्या सहकाऱ्यांशी चर्चा करत आहेत. पोलीस महासंचालकांशी चर्चा करत आहेत. यानंतर ते राज ठाकरेंच्या सभेबाबत निर्णय घेतील असे गृहमंत्री म्हणाले आहेत.
सभेला परवानगी द्यायची की नाही याबाबत पोलीस निर्णय घेतील. यामध्ये राज्य सरकारची कोणतीच भूमिका नाही. जर राज्यात कायदा आणि सुव्यवस्था बिघडवण्याचा कोणी प्रयत्न केला तर त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल असा इशारा सुद्धा पुन्हा एकदा गृहमंत्र्यांनी दिला आहे.