पालकमंत्री बच्चू कडू यांनी सोमवारी अकोला जिल्ह्यात केलेल्या गुप्त दौर्यात अनेक पोलिसांच्या चुकीच्या बाबी त्यांच्यसमोर उघड झाल्या. यामध्ये बच्चू कडू हे युसुफ खान बनून पालिकेत शिरले आणि धडक कारवाई केली. यानंतर पोलीस अधीक्षकांकडे संबंधित पोलिसांचा अहवाल सुद्धा पाठवण्यात आला आहे. त्यानंतर कर्मचाऱ्यांची दिरंगाई समोर आल्याने प्रभारी पोलीस अधीक्षक मोनिका राऊत यांनी काल अशा पोलिसांवर कारवाई करण्याचा आदेश दिला आहे.
पातुर पोलीस ठाण्यातील एका पोलीस कर्मचाऱ्याचं निलंबन करण्यात आलं. तर अकोला शहरातील जुने शहर पोलीस ठाण्यातील तीन कर्मचाऱ्यांची चौकशी करण्यात येणार आहे. याची चौकशी शहर पोलीस अधिक्षक सचिन कदम यांच्याकडून चौकशी सुरू करण्यात आली असून या चौकशीत नेमकं काय समोर येईल याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे..
यावेळी बच्चू कडू यांनी एक स्टिंग ऑपरेशन केलं. यावेळी त्यांनी दुपारच्या वेळेत शहरातील रेशन दुकानामध्ये जातात. धान्य आहे का? असं विचारलं असता त्यांना नकार देण्यात आला. त्यानंतर ते एका पान सेंटरमध्ये गेले आणि गुटखा खरेदी केला. यानंतर बच्चू कडू हे अकोला महापालिका कार्यालयात शिरले. महापालिका आयुक्त कार्यालयात त्यांना सुरक्षा रक्षकांकडून अडवलं गेलं.