Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
Saturday, 22 March 2025
webdunia

हिंदू ऐवजी, गर्व से कहो हम किसान है म्हणायची – आमदार बच्चू कडू

हिंदू ऐवजी, गर्व से कहो हम किसान है म्हणायची – आमदार बच्चू कडू
प्रहार संघटनेचे आक्रमक नेते बच्चू कडू यांनी भाजपा शिवसेनेवर जोरदार टीका केली आहे. आता देशात गर्व से कहो हम हिंदू है, ऐवजी गर्व से कहो हम किसान है अशी म्हणायची वेळ आली आहे, असे विधान आमदार बच्चू कडू यांनी केले आहे.

कांद्याला हमी भाव मिळावा यासाठी प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने चांदवड प्रांत कार्यालयावर मुक्काम मोर्चा काढला होता. यावेळी कडू आयांनी सरकारच्या धोरणांवर टीका केली आहे. आज राज्य आणि देशातील शेतकरी फार  अडचणीत आहर, मागील काही महिन्यात नाशिक जिल्ह्यात शेतकऱ्यांच्या आत्महत्यांनी शंभरी पार केली असे विदारक चित्र आहे. मात्र तरीही हे सरकार मंदिर, मशीद, पुतळे बांधण्याच्या विषयांना प्राधान्य देत आहे. दुसरीकडे मग  कांद्याचे भाव वाढले मग ओरड का होते ? कांद्याचे भाव वाढल्या नंतर दिल्लीत सरकार पडते ? मात्र भाव पडल्यानंतर ग्रामपंचायतमधील सत्ता देखील जात नाही असे होते आहे. आता गर्व से काहो हम हिंदू हे ऐवजी 'गर्व शसे कहो हम किसान है' अशी म्हणायची वेळ आली आहे, असे कडू म्हणाले आहेत. 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

न्यायाधीशाला भर कोर्टात सरकारी वकिलाने कानशिलात लावली, हे आहे कारण