Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

इंदुरीकर महाराजांना दणका! सर्वोच्च न्यायालयाने याचिका फेटाळली…

indorikar maharaj
, मंगळवार, 8 ऑगस्ट 2023 (20:53 IST)
मुंबई प्रसिद्ध कीर्तनकार निवृत्ती महाराज इंदूरकर यांना सर्वोच्च न्यायालयाने (Superm Court) मोठा दणका दिला आहे. इंदुरीकर महाराजांनी पुत्र प्राप्तीबाबत वादग्रस्त वक्तव्य केल्या प्रकरणात औरंगाबाद खंडपीठाने न्यायाधीशांचा निकाल कायम ठेवला होता.‌ तसेच सर्वोच्च न्यायालयाने त्यांची याचिका फेटाळून लावली आहे. त्यामुळे आता इंदुरीकर यांच्यावर गुन्हा दाखल करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
 
काय म्हणाले होते इंदुरीकर..
इंदुरीकर महाराज यांनी शिर्डी येथील ओझर मध्ये आयोजित करण्यात आलेल्या कीर्तनात एक वक्तव्य केले होते. सम तिथीला स्त्रीसंग झाला तर मुलगा होतो, विषम तिथीला झाला तर मुलगी होते. आणि स्त्रीसंग जर अशीव वेळेला झाला तर ती रांगडी, बेवडी आणि खानदान मातीत मिळवणारी होतात. जर टाईमिंग हुकला की क्वालिटी खराब, असं सांगत, पुलश्य नावाच्या ऋषींनी कैकसी नावाच्या स्त्रीशी सूर्य अस्ताला जाताना संग केला तर रावण, बिभीषण, कुंभकर्ण जन्माला आला. तर आदिती नावाच्या ऋषीने पवित्र दिवशी संग केला तर त्याच्या पोटी हिराण्यक्षपू नावाचा राक्षस जन्माला आला. हिरण्यकक्षपूने नारायण म्हणून संग केला तर भक्त प्रल्हाद जन्माला आला, असं इंदुरीकर महाराज कीर्तनात म्हणाले होते.
 
त्यामुळे त्यांच्या याच वक्तव्यावर आक्षेप घेण्यात आला होता. इंदुरीकर यांचे हे वक्तव्य म्हणजेच गर्भलिंग निदान निवडीची जाहिरात असल्याचा आरोप करण्यात आला होता. तसेच PCPNDT सल्लागार समितीने इंदुरीकर यांना नोटीस पाठवून खुलासा करण्याचे आदेश देखील दिली होते.
 
इंदुरीकर महाराज यांचं हे वक्तव्य गर्भलिंग निदान निवडीची जाहिरात असून PCPNDT कायद्याच्या कलाम २२ चे उल्लंघन असल्याचा आरोप त्याच्यावर झाला. त्यानुसार PCPNDT सल्लागार समितीने निवृत्ती महाराज इंदुरीकर यांना नोटीस पाठवून खुलासा मागितला होता. त्याच दरम्यान या प्रकरणात गुन्हा दाखल करावा म्हणून प्रथम वर्ग न्यायालयात १५६ (३) याचिका करण्यात आली होती. त्यानुसार गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले होते. मात्र सत्र न्यायालयाने हा आदेश रद्द केला होता.
 
कायद्याअंतर्गत अमुकतमुक केल्यानं मुलगा किंवा मुलगी होईल, यासंदर्भात कोणत्याही प्रकारची जाहिरात किंवा प्रचार हा गुन्हा ठरतो. गुन्हा सिद्ध झाल्यास तीन वर्षांपर्यंतची शिक्षा आणि दहा हजार रुपयापर्यंतचा दंड या शिक्षा होऊ शकतात.

Edited By - Ratnadeep Ranshoor

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

Indore: चिमुकलीसह कार कालव्यात कोसळली, चिमुकलीला वाचवण्यासाठी वडिलांनी उडी मारली