Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

बनावट पासपोर्टपासून सावध रहा,महाराष्ट्र सायबर विभागाचे आवाहन

बनावट पासपोर्टपासून सावध रहा,महाराष्ट्र सायबर विभागाचे आवाहन
, शनिवार, 20 जून 2020 (21:09 IST)
सध्या भारतीय पासपोर्टचा साचा डार्कनेटवर आणि इंटरनेटवर काळ्या बाजारात सहजपणे उपलब्ध आहेत. याचा दुरुपयोग करुन लोकांना फसवण्याचे प्रकार सुरू असून अशा बनावट पासपोर्टपासून सावध रहा, असे आवाहन महाराष्ट्र सायबर विभागामार्फत करण्यात आले आहे.
 
सायबर फसवे अशा टेम्लेट्स साधारण ९ ते २३ डॉलर या दरात विकत घेतात आणि त्यामध्ये आवश्यक तो बदल करुन बनावट पासपोर्ट बनवतात आणि त्याचा वापर करून सिमकार्ड विकत घेतात. अशा बनावट ओळखपत्रांचा उपयोग करून विकत घेतली जाणारी सिम कार्ड ही ऑनलाईन आर्थिक फसवणूक करण्यासाठी व अन्य विघातक कृत्यांसाठी वापरली जात असल्याचे समोर आले आहे.
 
 याबाबत महाराष्ट्र सायबर विभागाने सर्व नागरिकांना आवाहन केले आहे की, “सावध रहा! तुमचा पासपोर्ट कोणत्याही अनोळखी व्यक्तीच्या हातात देऊ नका. तुमच्या पासपोर्टच्या स्कॅन कॉपीजना पासवर्ड देऊन सुरक्षित करा, ज्यामुळे तुमच्याशिवाय अन्य कोणालाही ती फाईल ओपन करता येणार नाही. ज्या ठिकाणी तुम्ही तुमच्या पासपोर्टची प्रत देणार असाल त्या प्रतीवर निळ्या पेनच्या शाईने सही व त्यादिवशीची तारीख पण नमूद करा, असे आवाहनही सायबर विभागाने केले आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

ग्रामीण भागाने करोना संक्रमण प्रभावीपणे रोखले