Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
Tuesday, 1 April 2025
webdunia

कोरोनाची संभाव्य तिसरी लाट थोपविण्यासाठी सज्ज राहा; यंत्रणा प्रभावीपणे राबवा – उपमुख्यमंत्री

Be prepared
, सोमवार, 24 मे 2021 (07:47 IST)
बारामती तालुक्यामध्ये कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेचा विचार करुन यंत्रणा प्रभावीपणे राबवत, कोरोनाची संभाव्य लाट थोपविण्यासाठी सज्ज राहा. कोरोनाची साखळी तोडण्यासाठी आवश्यक त्या सर्व उपाययोजना करण्याच्या सूचना उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी आज दिल्या.
बारामती येथील विद्या प्रतिष्ठानच्या सभागृहात कोविड -19 विषाणू प्रादुर्भावाची परिस्थिती आणि उपाययोजनांचा आढावा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी  घेतला. त्यावेळी ते बोलत होते. 
 
उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, ‘कोरोना’च्या संभाव्य तिसऱ्या लाटेचा विचार करुन सर्व विभागांनी प्रभावीपणे यंत्रणा राबवावी. या लाटेमध्ये लहान बालके बाधित होण्याचा धोका संभावतो आहे. त्यांच्यासाठी रुग्णालयामध्ये स्वतंत्र खाटा राखीव ठेवण्यायबाबत कार्यवाही करावी. रुग्णालयात सर्व सुविधा असणे आवश्यक आहे, बारामती तालुक्यातील सर्व रुग्णालयामध्ये फायर व ऑक्सिजन ऑडिट वेळेवर करुन घ्यावे, सर्व रुग्णालयामध्ये जनरेटरची सुविधा असणे आवश्यक आहे. रुग्णालये स्वच्छ ठेवणे आवश्यक आहे. कोविड सेंटर तपासणीसाठी अधिकाऱ्यांची नियुक्ती करावी. सध्या कोरोना रुग्णांचा आकडा कमी होताना दिसत आहे, ही बाब दिलासादायक आहे. तथापि मृत्यू दर नियंत्रणात आणण्यासाठी प्रयत्न करण्यात यावेत. कोणत्याही रुग्णांलयामध्ये ऑक्सिजनची कमतरता भासणार नाही याची दक्षता घ्यावी. त्यासाठी अगोदरच नियोजन करुन ठेवावे, निधीची कमतरता पडू देणार नाही. म्युकरमायकोसिसचा प्रादुर्भाव कोरोना रुग्णांमध्ये वाढत आहे. या रुग्णांसाठी स्वतंत्र व्यवस्था करावी. या रोगासाठीच्या औधषांच्या पुरवठ्यामध्ये गैरप्रकार न होता योग्य वापर व नियोजन करण्यात यावे. कोरोनातून बरे झालेल्या नागरिकांना म्युकरमायकोसिस अथवा अन्य काही लक्षणे दिसल्यास याची माहिती दूरध्वनीवरुन घेण्यात यावी.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

लहान मुलांमधील संसर्गाबाबत बेसावध राहू नका, वेळीच डॉक्टरला दाखवा : मुख्यमंत्री