आता नवीन शैक्षणिक धोरणानुसार बीएड, डीएड महाविद्यालयांमध्ये बदल होणार आहे. सध्या चालू महाविद्यालयांचे क्लस्टर तयार करून दोन वर्षांचे बीएड, डीएड आता चार वर्षांचे होणार असून त्यात विद्यार्थ्यास पदवीसह बीएड, डीएडचे प्रमाणपत्र मिळणार आहे.
बीएड, डीएडकडे विद्यार्थ्यांचा ओढा कमी झाल्याची वस्तुस्थिती आहे. आता नवीन शैक्षणिक धोरणानुसार, बीए बीकॉम, बीएस्सी करून दोन वर्ष केले जाणारे बीएड आता बंद करण्यात येणार आहे.
पदवीचे शिक्षण घेताना बीएडचा अभ्यासक्रम त्यात समाविष्ट केला जाणार असून चार वर्षाचे शिक्षण पूर्ण झाल्यावर विद्यार्थ्यांना बीए, बीएस्सी किंवा बीकॉमची पदवी त्यांच्या अभ्यासक्रमानुसार मिळणार आहे. राज्यातील बीएड महाविद्यालयांना येत्या काही वर्षात स्वतःमध्ये बदल करावा लागणार असून आता बीएड चार वर्षाचे होणार असून त्याची अंमलबजावणी संपूर्ण देशात 2023 पासूनच प्रभावी होणार आहे. नवीन शैक्षणिक धोरणानुसार, बीएड आता चार वर्षाचे होणार असून इयत्ता बारावी नंतर विद्यार्थ्यांना चार वर्षात बीए, बीकॉम, बीएस्सी पदवींसह बीएडची डिग्री मिळणार आहे.