Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

अहमदनगर खासगीसह सरकारी हॉस्पिटलमधील बेड झाले फुल्लं ; नागरिकांची धावाधाव

अहमदनगर खासगीसह सरकारी हॉस्पिटलमधील बेड झाले फुल्लं ; नागरिकांची धावाधाव
अहमदनगर , शनिवार, 10 एप्रिल 2021 (08:04 IST)
जिल्ह्यात दिवसेंदिवस कोरोनाबाधितांची आकडेवारी वाढू लागल्याने परिस्थिती अत्यंत नाजूक बनत चालली आहे.यामुळे प्रशासनासह नागरिकांची देखील चांगलीच धावाधाव होऊ लागल्याचे चित्र सध्या जिल्ह्यात दिसू लागले आहे.जिल्ह्यात रोज दीड-दोन हजार नव्या कोरोनाबाधितांची भर पडत आहे. खासगी, सरकारी हॉस्पिटलमधील बेड फुल्लं झाल्याने बाधितांसाठी बेड मिळविण्याकरीता नातेवाईकांची धावपळ सुरू आहे.महापालिकेने कोवीड सेंटर सुरू केले असले तरी तेथे ऑक्सीजन बेड नाही. सिव्हील हॉस्पिटलमध्ये असलेले ऑक्सीजन बेडची कॅपॅसिटी संपली आहे.बूथ हॉस्पिटलही फुल्लं झाले आहे. खासगी हॉस्पिटलमध्येही कोरोनाग्रस्तांची संख्या वाढल्याने तेथेही बेड शिल्लक नाही. दरम्यान, बाधितांसोबतच आता मृतांचा आकडाही वाढला आहे.जिल्हा प्रशासनाकडून पोर्टलवर आकडे अपलोड करण्याकरीता विलंब होत असल्याने रोज 15 मृत्यू होत असल्याची आकडेवारी जाहीर केली जात आहे. प्रत्यक्षातील चित्र मात्र भयावह आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

कोरोनाशी झुंज देणा-या महिलेकडे घरफोडी करणारा अटकेत