Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

Bhandara : 14 महिन्यांच्या बाळाचा पाण्याच्या टाकीत बुडून मृत्यू

Baby death
, शुक्रवार, 27 ऑक्टोबर 2023 (09:38 IST)
घरात लहान मुलं असतात तेव्हा खूप काळजी घेण्याची गरज असते. लहान मुलांना कधीही एकटे सोडू नये. अन्यथा काहीही अपघात घडू शकतात. असेच काहीसे घडले आहे. भंडाऱ्यात 14 महिन्यांचा बाळाचा पाण्याच्या टाकीत बुडून मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे.  

भंडाऱ्याच्या तुमसर तालुक्यात राजापूर येथे अंगणातील पाण्याच्या टाकीत चिमुकल्याचा बुडून मृत्यू झाला. अदिक अतुल शहारे असे या चिमुकल्याचे नाव आहे. 

झाले असे की आदिकचे वडील अतुल बाहेर जात असताना त्यांनी काहीवेळा शेजारच्यांच्या घरात ठेवलं पण खेळता खेळता अदिक आपल्या घरी परत आला. आदिकच्या वडिलांनी घरी परत आल्यावर अदिक कुठे आहे अशी विचारणा शेजारी केली असता अदिक कुठेही सापडला नाही. तेव्हा त्याची शोधाशोध सुरु झाली आणि पाण्याच्या टाकीतून पाणी काढताना पाण्याच्या टाकीत अदिकचे मृतदेह तरंगताना दिसले. तातडीने त्याला बाहेर काढून डॉक्टरांकडे नेले असता डॉ. ने त्याला मृत घोषित केले. या अपघातामुळे कुटुंबीयांनी टाहो फोडला. त्यांना मोठा धक्का बसला. या घटनेमुळे परिसरात मोठी  हळहळ व्यक्त केली जात आहे. 

Edited by - Priya Dixit  

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

Karnataka Road Accident: ट्रकला SUV कारची धडक, 13 जणांचा जागीच मृत्यू