Bhandara :भंडाराच्या मोहाडी तालुक्यात हरदोली झंझाळ येथे अंत्यसंस्काराच्या वेळी मधमाश्यांनी हल्ला केला.अचानक झालेल्या हल्ल्यामुळे नागरिकांची तारांबळ उडाली.
भंडारा जिल्ह्यातील हरदोली गावातील मारोती कबल गायधणे यांचा मृत्यू झाला. त्यांच्यावर आज स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले असता गावातील नागरिक आणि नातेवाईक जमले होते. त्यावेळी सरणातून निघणाऱ्या धुरे मुळे स्मशानभूमीत चिंचेचे झाडावर मधमाशांचे पोळे होते. सरणाचे धूर लागल्याने मधमाशांनी नागरिकांवर हल्ला केला.
अचानक झालेल्या हल्ल्यामुळे नागरिकांची तारांबळ उडाली. लोकांनी हल्ल्यापासून वाचण्यासाठी सैरावैरा पळायला सुरु केले. या घटनेचा व्हिडीओ सोशलमिडीयावर व्हायरल झाला आहे.
दोन दिवसांपूर्वी पुण्यातील राजगड किल्यावर फिरायला आलेल्या पर्यटकांवर मधमाशांनी हल्ला केल्याची घटना घडली होती. आता भंडाऱ्यात स्मशानभूमीत मृत व्यक्तींवर अंत्यसंस्कार सुरु असताना. जमलेल्या नागरिकांवर मधमाशांनी हल्ला केला. मृतदेहाला अग्नी देताना निघालेला धूर झाडावरील असलेल्या मधमाशांच्या पोळ्यापर्यंत पोहोचला आणि मधमाशांनी हल्ला केला. या मुळे नागरिकांमध्ये घबराहट पसरली.