Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

भुजबळांनी मनोज जरांगेंवर साधला निशाणा

chagan bhujbal
, सोमवार, 6 नोव्हेंबर 2023 (21:11 IST)
जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी गावात आंदोलन करण्यात आले होते. त्यावेळी आंदोलकांवर पोलिसांकडून लाठीहल्ला करण्यात आला. ज्यानंतर मराठा आरक्षणासाठीचे आंदोलन पेटले. या घटनेनंतरच मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील हे प्रकाशझोतात आले. त्यानंतर त्यांनी सरकारला मराठा आंदोलनासाठी वेठीस धरण्याचे काम सुरू केले. मराठा समाजाला ओबीसीमध्ये समाविष्ट करत त्यांना सरसकट कुणबी प्रमाणपत्र देण्यात यावे आणि मराठा आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्यात यावे, अशी मागणी जरांगे यांच्याकडून करण्यात आली आहे. परंतु, या मुद्द्यावरून सरकारमधील अन्न-नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी मनोज जरांगे आणि मराठा आंदोलकांवर निशाणा साधला आहे.

मराठा आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्याच्या मुद्द्यावरून बोलताना भुजबळ म्हणाले की, घरांवर दगड फेकण्यात आली. त्यांच्यावर कारवाई करायला हवी. पण, सगळे गुन्हे माफ करण्यात आले. मनोज जरांगे पाटील म्हणाले की, जाळपोळ करणारी आमचे माणसे नाहीत. सरकारने आपल्या लोकांची घरे जाळली. तुमची माणसे नाहीत हे आम्ही मान्य करतो. मग, त्यांचे गुन्हे मागे घ्या असे ते का सांगतात? ज्यांच्या घरावर हल्ले झाले त्यांच्या घरी मुले, बाळे आहेत की नाही ते पाहिले नाही. जे कोणी होते ते असतील बाहेरचे. मराठा समाज हा समजूतदार आहे. त्यांना काय करायला पाहिजे ते त्यांना कळत. मग आता बेकायदेशीरपणे जे वागत आहे ते कोण आहेत, असा प्रश्न छगन भुजबळ यांनी उपस्थित केला.
 
Edited By - Ratnadeep Ranshoor

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

लासलगाव :मोबाईलच्या वादात मित्राचाच खून करणाऱ्या युवकास जन्मठेप