Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

लासलगाव :मोबाईलच्या वादात मित्राचाच खून करणाऱ्या युवकास जन्मठेप

jail
, सोमवार, 6 नोव्हेंबर 2023 (21:06 IST)
चांदवड येथील बस स्थानकावर दोन मित्रांमध्ये मोबाईल वरून झालेल्या वादातून चाकूने वार केल्याने सद्दाम फारूक शेख यांचा खून केल्याप्रकरणी दादाभाऊ उर्फ प्रेम निवृत्ती पवार यास निफाडचे अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश अजय गुजराथी यांनी जन्मठेप व दहा हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली आहे.
 
याबाबत अधिक माहिती अशी की, चांदवड येथील बस स्थानकावर मोबाईल देणे घेण्याचे कारणावरून वाद होऊन राग आल्याने दादाभाऊ उर्फ प्रेम निवृत्ती पवार (रा.आडगाव, ता.चांदवड) यांनी चांदवड येथील पिकअप भाड्याने चालवण्याचा व्यवसाय करणारा चालक सद्दाम फारुख शेख याचा दिनांक 17 एप्रिल 2019 रोजी दुपारी पावणेचार वाजता धारधार चाकूने छाती, पोटावर आणि दंडावर मोठ्या प्रमाणावर वार केल्याने सद्दाम फारुक शेख यांचा मृत्यू झाला.
 
या प्रकरणी मयत सद्दामचा भाऊ इमरान फारुक शेख याने पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती. चांदवड पोलिसांनी भा. दं. वि कलम 302 अन्वये तपास करून संशयित प्रेम निवृत्ती पवार याचे विरोधात निफाड न्यायालयात खटला दाखल केला होता. जिल्हा सहाय्यक सरकारी  अभियोक्ता आर. एल. कापसे यांनी सरकार पक्षातर्फे नऊ साक्षीदार तपासले.
 
सर्व साक्षी पुरावे लक्षात घेता  जिल्हा व सत्र न्यायाधीश अजय गुजराथी यांनी दादाभाऊ उर्फ प्रेम निवृत्ती पवार यास जन्मठेप व दहा हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे. सरकार पक्षातर्फे जिल्हा सहाय्यक सरकारी वकील ॲड. आर. एल .कापसे यांनी काम पाहिले.








Edited By - Ratnadeep Ranshoor

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

स्वेटर नाही, रेनकोट बाहेर काढा; काय आहे हवामान विभागाचा अंदाज? जाणून घ्या