Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

बिचुकले यांनी २८ नोव्हेंबरला सातारा बंद ठेवण्याचे आवाहन सातारकरांना केले

Abhijit Bichukale
, शनिवार, 26 नोव्हेंबर 2022 (08:07 IST)
भगतसिंह कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांवरून केलेल्या वक्तव्यावरून राज्यात राजकीय वातावरण तापले असून माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी येत्या दोन दिवसांत सर्वपक्षीयांना एकत्र येण्याचे आवाहन केले आहे. महाराष्ट्र बंद ठेवण्याबद्दल ठरवू असे म्हटले होते. यानंतर महाराष्ट्रातील हाय प्रोफाईल नेते म्हणून ओळखले जाणारे अभिजित बिचुकले यांनी २८ नोव्हेंबरला सातारा बंद ठेवण्याचे आवाहन सातारकरांना केले आहे.
 
कोश्यारी यांनी शिवाजी महाराजांची जी काही तुलना केली, शुल्लक लोकांशी केली त्यामुळे महाराजांचा अपमान झाला आहे. लायकी नसलेल्यांची तुलना छत्रपती शिवाजी महाराजांबरोबर करणे म्हणजे महाराजांचा घोर अपमान आहे. कोश्यारींनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचाही एकेरी उल्लेख करत अपमान केला आहे. यामुळे मी समस्त सातारकरांना आवाहन करतोय की, येत्या २८ नोव्हेंबरला माझा वाढदिवस आहे, त्या वाढदिनी सातारा जिल्हा बंद ठेवावा, असे बिचुकलेंनी म्हटले आहे.
 
Edited By- Ratnadeep Ranshoor

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

समलिंगी विवाहाच्या मुद्द्यावर सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारकडून उत्तर मागितले आहे