Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

अंगणवाडी सेविका भरतीत मोठा भ्रष्टाचार!; विवाहित महिलेला अविवाहित दाखला दिल्याने खळबळ

अंगणवाडी सेविका भरतीत मोठा भ्रष्टाचार!; विवाहित महिलेला अविवाहित दाखला दिल्याने खळबळ
, बुधवार, 1 सप्टेंबर 2021 (15:54 IST)
मनमाड नजीक असलेल्या दहेगावं ग्रामपंचायत अंतर्गत येणार्‍या अंगणवाडी सेविकेच्या भरतीत मोठा भ्रष्टाचार झाला असुन विवाहित महिलेला अविवाहित दाखला देऊन शासनाची फसवणूक करण्यात आली आहे. तसेच या भरतीत आर्थिक देवाण घेवाण करून भरती केल्याचा आरोप येथील विनिता गायकवाड या महिलेने केला आहे.
 
याबाबत आपण जिल्हा परिषदेच्या सीईओसह बीडीओ यांच्याकडे तक्रार अर्ज करण्यात आला आहे.मात्र अद्यापही याबाबत कोणत्याही प्रकारची चौकशी करण्यात आली नसुन या भरतीची चौकशी करून दोषींवर कारवाई करावी अन्यथा पंचायत समितीच्या कार्यालयाबाहेर आमरण उपोषण करणार असल्याचे गायकवाड यांनी सांगितले.
 
नाशिक जिल्ह्यातील चांदवड तालुक्यातील महिला बालविकास प्रकल्प अंतर्गत होणार्‍या अंगणवाडी सेविका भरतीमधे मोठ्या प्रमाणावर भ्रष्ट्राचार झाला असुन मनमाड नजीक असलेल्या दहेगाव येथील ग्रामसेवक सरपंच यांनी सोनवणे व चौधरी साहेब यांच्याशी संगनमत करून विवाहित असलेल्या महिलेला अविवाहित तसेच गावात रहिवासी नसतांना रहिवासी दाखला देऊन शासनाची फसवणूक केली तसेच आपत्र असलेल्या महिला उमेदवारास पात्र करून भरती केली असल्याचा आरोप विनिता गायकवाड या महिलेने केला असुन या भरतीत मोठ्या प्रमाणावर भ्रष्ट्राचार झाला आहे.
 
याबाबत आम्ही सीईओ तसेच बीडीओ यांच्याकडे तक्रारी देऊन देखील अजूनही काहीच कारवाई झालेली नाही शासनाने या भरती प्रक्रियेला स्थगिती देऊन चौकशी करून दोषी असणार्‍या अधिकार्‍यांवर कारवाई करावी अशी मागणी गायकवाड यांनी केली आहे.
 
ग्रामसेवक, संबंधित अधिकार्‍यांकडून शासनाची फसवणूक
येथील महिलेचे लग्‍न होऊन तिला एक मुलगा आहे.तसेच ती तिच्या सासरी राहते तरीही केवळ आर्थिक लाभापोटी सदर महिलेला कुमारीचा अविवाहित दाखला तसेच गावाची रहिवासी नसतांना रहिवासी दाखला दिला आहे. ग्रामसेवक सरपंच तसेच बालविकास प्रकल्प अधिकारी यांनी शासनाची फसवणूक केली असून याबाबत चौकशी व्हावी.
 
अंगणवाडी सेविका या पदासाठी महिला त्या गावची रहिवासी असावी अशी अट असतांना देखील गावात न राहणार्‍या महिलेला दाखला देत शासनाची फसवणूक केली आहे.या सबंध भरती प्रकियेची चौकशी करून दोषींवर कारवाई तसेच योग्य उमेदवाराना भरती करावे अशी मागणी असुन जर चौकशी करून दोषींवर कारवाई केली नाही तर पंचायत समितीच्या कार्यालयाबाहेर आमरण उपोषण करणार असून यास सर्वस्वी प्रशासन जबाबदार असेल.
 
: विनिता गायकवाड, तक्रारदार महिला

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

शिक्षक दिन 2021 विशेष: डॉ सर्वपल्ली राधाकृष्णन बद्दल या विशेष गोष्टी जाणून घ्या