Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

10वी-12वी परीक्षांआधी मोठा निर्णय

exam
, सोमवार, 13 फेब्रुवारी 2023 (14:26 IST)
दहावी, बारावीची परीक्षा कॉपीमुक्त वातावरणात पार पाडण्यासाठी प्रश्नपत्रिका परीक्षेपूर्वी दहा मिनिटे अगोदर देण्याचा निर्णय यंदापासून रद्द करण्यात आला आहे. राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या गेल्या काही परीक्षांपासून प्रश्न पत्रिका मोबाइलद्वारे सोशल मीडियावर व्हायरल होण्याचे गैरप्रकार वाढले आहेत. यंदा या प्रकारांना आळा घालण्यासाठी शिक्षण मंडळाने विद्यार्थ्यांना वाचनासाठी परीक्षेच्या आधी प्रश्नपत्रिका न देण्याचा निर्णय घेतला आहे.
 
या दहा मिनिटांत विद्यार्थी प्रश्नपत्रिकेचे नीच वाचन करून पेपर कसा सोडवायचा याविषयी विचार करत होते, पण आता विद्यार्थ्यांना प्रश्पत्रिकेचे वाचन, अवलोकन तसेच प्रश्न सोडविण्यासाठी वेळेचे नियोजन कसे करावे असा प्रश्न पडणार आहे. त्यामुळे परीक्षेचा वेळ 10 मिनिटाने वाढवावा अशी मागणी करण्यात येत आहे. 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

मुंबईत झोपड्यांना भयानक आग