कोरोनामुक्त असलेल्या काही भागात 8 वी ते 12 वी चे वर्ग सुरु करण्याचे शिक्षण विभागाकडून सांगण्यात आले होते.परंतु काही कारणास्तव हा निर्णय मागे घेण्यात आला आहे आणि निर्णयात काही तांत्रिक त्रुटी असल्यामुळे तो अधिकृत संकेत स्थळावरून काढण्यात आला आहे.या वर लवकरच निर्णय घेऊन तो पुन्हा जारी केली जाण्याची माहिती शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांनी दिली आहे.
शाळा सुरू करण्यापूर्वी स्थानिक पातळीवर कोरोनाचा अहवाल मागवला जाणार आहे आणि तसेच जिल्ह्यातील आढावा घेण्यात येणार असे सांगितले आहे.त्याचप्रमाणे शाळा सुरु करण्यापूर्वी पालक आणि मुख्याध्यापकांची संमती घेणे आवश्यक असणार आहे,
या सर्व बाबींना लक्षात घेऊनच शाळा सुरु करण्याचा निर्णय घेण्यात येईल आणि शासनाचा तसा नवीन निर्णय जारी करण्यात येईल अशी माहिती मिळत आहे.
शासनाने मागे घेतलेल्या या निर्णयाची माहिती अद्याप शिक्षण अधिकाऱ्यांना माहिती नसल्यामुळे गोंधळाचे वातावरण निर्माण झाल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.