Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

चला नोकरीसाठी अर्ज करू, मुंबई पोलिस विभागात रिक्त जागांसाठी मोठी भरती

mumbai police
शनिवार, 21 मे 2022 (21:22 IST)
मुंबई पोलिस विभागातील रिक्त जागांसाठी मोठी भरती करण्यात येणार आहे. पोलिस कॉन्स्टेबल पदांसाठी ही भरती होणार आहे. यासंदर्भात मुंबई पोलिस विभागाने अधिकृत अधिसूचना जारी केली आहे.
 
मुंबई पोलिस विभागात कॉन्स्टेबल पदासाठी 1,431 रिक्त जागाची भरती करण्यात येणार आहे. ज्या इच्छुक आणि पात्र उमेदवार या पदासाठी अर्ज करायचा आहे त्यांनी मुंबई पोलिसांची अधिकृत वेबसाईटला https://www.mahapolice.gov.in/ भेट देऊन अर्ज करु शकतात.
 
या पदांसाठी बारावी पास असणे आवश्यक आहे. तसेच उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्था किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलेले असावे. तर महिलांसाठी (155 cm) आणि पुरुषांसाठी (165 cm) इतकी शारीरिक क्षमता असावी असे म्हटले आहे.
 
ही आवश्यक कागदपत्रे जवळ ठेवा....
– स्वतःचा Resume ( बायोडेटा )
 
– दहावी, बारावी आणि पदवी परीक्षेचे प्रमाणपत्र
 
– शाळा सोडल्याचा दाखला
 
– जातीचा दाखला ( मागासवर्गीय उमेदवारांसाठी )
 
– ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स, पासपोर्ट )
 
– पासपोर्ट साईझ फोटो

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

मुख्यमंत्र्यांनी माझे कुटुंब माझी जबाबदारी पार पाडावी : नवनीत राणा