Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

महाराष्ट्रात बर्ड फ्लूबाबत अलर्ट जारी, रेस्क्यू सेंटरमध्ये वाघ आणि बिबट्यांचा मृत्यू

महाराष्ट्रात बर्ड फ्लूबाबत अलर्ट जारी, रेस्क्यू सेंटरमध्ये वाघ आणि बिबट्यांचा मृत्यू
, सोमवार, 6 जानेवारी 2025 (11:05 IST)
Maharashtra news: महाराष्ट्रात बर्ड फ्लूचा प्रादुर्भाव वाढत असून, त्यासाठी राज्यात अलर्टही जारी करण्यात आला आहे. राज्यात प्रथमच वाघ आणि 1 बिबट्याचा बर्ड फ्लूमुळे मृत्यू झाल्याने संपूर्ण वनविभाग हादरला आहे. मिळालेल्या माहितीनुसार राज्यात प्रथमच बर्ड फ्लूमुळे वाघ आणि 1 बिबट्याचा मृत्यू झाल्याने संपूर्ण वनविभाग हादरला आहे. त्यामुळे सर्व प्राणीसंग्रहालय आणि संक्रमण उपचार केंद्रांमध्ये विशेष खबरदारी घेण्याच्या सूचना देण्यात आल्या आहे. तसेच हा विषाणू हवेतून पसरत असल्याने तो मानवांसाठीही धोकादायक ठरण्याची शक्यता आहे. त्यामुळेच सर्व वन्य प्राण्यांची तपासणी आणि देखभाल करण्यासाठी गोरेवाडा रेस्क्यू सेंटरमध्ये 6 पशुवैद्यकांची टीम तयार करण्यात आली आहे.  
 
मिळालेल्या माहितीनुसार गोरेवाडा रेस्क्यू सेंटरमध्ये उपचारादरम्यान वाघ आणि बिबट्यांचा मृत्यू झाल्यानंतर त्यांचे नमुने भोपाळच्या पशुवैद्यकीय प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवण्यात आले होते. बर्ड फ्लूमुळे मृत्यू झाल्याचे वृत्त समोर आल्यानंतर गोरेवाडा रेस्क्यू सेंटर व्यवस्थापनाने आता कडक पावले उचलली आहे. 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

एकाच कुटुंबातील 5 जणांचा गुदमरून मृत्यू