Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

भाजपाचे सर्वाधिक ५२ नगराध्यक्ष तर शिवसेना तिसरया क्रमांकावर

भाजपाचे सर्वाधिक ५२ नगराध्यक्ष तर शिवसेना तिसरया क्रमांकावर
नगराध्यक्ष हा थेट नागरिकांनी निवडला पाहिजे अशी भाजपाची मात्रा लागू पडली आणि नगरसेवक जरी कमी असले तरी सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे निवडून आले आहे. म्हणजेच या सर्व नगर परिषदाना भाजपवर अवलंबून रहावे लागणार आहे. यामध्ये भाजपाने तब्बल 31  जिंकून भाजपनं मिनी विधानसभेत आघाडी घेतली आहे. सोबतच 52 ठिकाणी भाजपचे थेट नगराध्यक्षही निवडून आले आहेत. 
 
147 नगरपरिषदा आणि 18 नगरपंचायतीसाठी एकूण 165 ठिकाणी मतदान पार पडलं. सरासरी 70 टक्के मतदान झाल्याची माहिती आहे. भाजपपाठोपाठ 20 नगरपालिका जिंकत काँग्रेसनं दुसऱ्या क्रमांकावर बाजी मारली आहे. काँग्रेसचेही 22 ठिकाणी थेट नगराध्यक्ष निवडून आले आहेत. तर राष्ट्रवादी 17 नगरपालिकांसह तिसऱ्या स्थानावर आहे. शिवसेना 16 नगरपालिकांसह शेवटच्या नंबरवर आहे. तर दुसरीकडे केंद्रात आणि राज्यात भाजपा पूर्ण बहुमताचे सरकार असून राज्यात नगरविकास खाते भाजपाने स्वतः कडे ठेवले आहे त्यामुळे या निवडणुकीत जिंकून आनंद करत असलेल्या इतर पक्षांना काम कसे करावे हा प्रश्न आता सतावत आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

मनसे नाही तर एमआयएम पुढे