औरंगाबाद-नुकत्याच झालेल्या नगरपंचायत निवडणुकीत शिवसेनेने सोयगाव नगरपंचायतीवर सत्ता मिळवत भाजपला धक्का दिला. आता भाजपला दुसरा धक्का बसणार आहे याचे संकेत राज्याचे महसूल राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी दिले आहेत.
शिवसेनेच्या शिवतेज अभियाना अंतर्गत आयोजित कार्यकर्मात अब्दुल सत्तार म्हणाले की नगरपंचायत निवडणुकीमध्ये शिवसेनेचे वर्चस्व दिसलं आता मतदारसंघातून भाजपचा लवकरच सुपडासाफ होईल. त्यांनी भाजपचे पाच हजार पदाधिकारी, कार्यकर्ते शिवसेनेच्या वाटेवर असल्याचा दावाही केला आहे.
भाजपचे अनेक पदाधिकारी आपल्या संपर्कात असून सिल्लोड सोयगाव मतदारसंघातील 5 हजार पदाधिकारी आणि कार्यकर्ते हे शिवसेनेत प्रवेश करणार आहेत, असं त्यांनी म्हटलं आहे.
इकडे सोयगाव नगरपंचायत निवडणुकीमध्ये शिवसेनेचे नेते अब्दुल सत्तार यांनी भाजपचे नेते आणि केंद्रीय रेल्वे मंत्री रावसाहेब दानवे यांना जोरदार धक्का दिला होता. पण, आज पुन्हा एकदा सत्तार यांनी दानवेंना आणखी एक तडाखा दिला आहे. सत्तार यांनी भाजपचे 4 नवनिर्वाचित सदस्य सेनेत सामील झाले आहे.