Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

चंद्रकांत पाटील विरोधकांना जीवनातून उठवतात

चंद्रकांत पाटील विरोधकांना जीवनातून उठवतात
, शुक्रवार, 7 ऑगस्ट 2020 (17:45 IST)
भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांचे दोन चेहरे आहेत. त्यांचा एक चेहरा हा लोकांना मदत करणारा, विचार न करता काहीही बोलणारा, दिसायला प्रांजळ आहे. पण दुसरा चेहरा भयंकर आहे. ते आपल्याला मिळालेल्या सत्तेचा आणि संपत्तीचा वापर विरोधकांचा काटा काढून त्यांना जीवनातून उठवण्यासाठी करतात, असा खळबळजनक आरोप ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी केला आहे.
 
चंद्रकांत पाटील (BJP Chandrakant Patil) यांनी दोन दिवसांपूर्वी प्रसारमाध्यमांना एक पत्र पाठवून पाच वर्षात केलेल्या कामाचा लेखोजोखा दिला. या पत्राची प्रत त्यांनी ग्रामविकासमंत्री मुश्रीफ व पालकमंत्री सतेज पाटील यांना पाठवताना हे दोघे सतत विनाकारण आरोप करत असल्याचा उल्लेख केला होता. आरोप करताना मैत्र संस्कृती पाळत नसल्याचा टोलाही त्यांनी मारला होता. यावर मुश्रीफ यांनी गुरुवारी प्रसारमाध्यमांना एक निवेदन दिले आहे. त्यामध्ये त्यांनी चंद्रकांत पाटील यांच्यावर गंभीर आरोप केले (Indian politics)आहेत.
 
मुश्रीफ यांनी प्रसारमाध्यमांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, चंद्रकांत पाटील यांनी मला पाठवलेले परंतु मला न मिळालेले पत्र प्रसिद्धी माध्यामातून वाचले व मी आश्चर्यचकित झालो. कारण कोरोना संकटकाळामध्ये त्यांनी कोल्हापूरकडे पाठ फिरवली व मदत दिली नाही, असे वक्तव्य अलीकडच्या काळात मी केलेले नाही. त्यामुळे त्यांनी पत्र लिहून कोरोना संकटामध्ये किती मदत केली ही जाहीर करण्याची संधी मिळावी म्हणून निमित्त आहे, असे वाटते. गेल्या पाच वर्षात त्यांना मिळालेल्या सत्ता आणि संपत्तीमुळे त्यांनी दोन-तीन लाख लोकांना मदत केली असेल. याची मला खात्री आहे. पण मी आणि माझ्या फाऊंडेशनने केलीली मदत जाहीर केली तर ते पुन्हा ईडी, इन्कमटॅक्स माझ्या मागे लावतील त्यामुळे ते मी जाहीर करत नाही.
 
मुश्रीफ पुढे म्हणाले, मी काही तुमचा शत्रू नव्हतो, मात्र वैचारीक विरोध होता. परंतु मला संपवण्यासाठी केडीसीसी बँकेची कलम 88 अंतर्गत कारवाई करण्यासाठी अधिकाऱ्यांवर दबाव आणला. एमएससी बँकेवर 88 ची कारवाई सुरु केली. मी सहकार क्षेत्रात राहूच नये म्हणून दहा वर्षे पूर्वलक्षी प्रभावाने अध्यधेश काढून कायदा केलात ते फक्त मला संपवण्यासाठी. त्यावेळी अजित पवार व इतर नेते आपल्याला वरील कारवईबाबत भेटले. आपण त्यांना आपल्या स्वभाप्रमाणे म्हणाला, होय मी चौकशी लावली आहे, ती मागे घेणार नाही. त्यामध्ये मला हसन मुश्रीफ यांना अडकवायचे आहे. यानंतर ईडी, इन्कमटॅक्स स्तत्र सुरु राहिले, असे मश्रीफ यांनी निवेदनात म्हटले आहे. दरम्यान, जनतेने माझ्यावर जी जबाबदारी सोपवली आहे ती पूर्ण करेन. कोणाचेही आयुष्य बरबाद करणार नाही, असा टोलाही मुश्रीफ यांनी या पाटील यांना लगावला.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

मद्रास हायकोर्टाने बाबा रामदेव यांना फटकारले, पतंजली आयुर्वेदला तब्बल दहा लाखांचा दंड ठोठावला