भाजपचे शहराध्यक्ष भगिरथ बियाणी यांनी स्वता:जवळील बंदुकीने डोक्यात गोळी झाडून घेत आत्महत्या केली. ही घटना आज सकाळी बीड शहरातील एमआयडीसी भागातील बियाणी यांच्या राहत्या घरी घडली. आत्महत्येचे कारण अद्याप स्पष्ट नाही.
बियाणी हे भाजपचे निष्ठावंत कार्यकर्ते होते. सोमवारी रात्री आपल्या कुटूंबासमवेत रात्री उशिरापर्यंत त्यांनी गप्पा मारल्या. नंतर ते आपल्या खोलीत जावून झाेपले. पहाटेच्या सुमारास उशिरापर्यंत दरवाजा उघउला नसल्याने कुटूंबियाने पाहिले तर बियाणी हे रक्ताच्या थारोळ्यात पडले होते. त्यांना तात्काळ बीड शहरातील एका खासगी रूग्णालयात दाखल करण्यात आले. तेथील डॉक्टरांनी त्यांना मयत घोषित केले. शवविच्छेदन करण्यासाठी मृतदेह जिल्हा रूग्णालयात नेण्यात आला. दरम्यान, घटनेची माहिती समजताच खा.प्रीतम मुंडे, पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकुर यांच्यासह शेकडो, पदाधिकारी कार्यकर्त्यांनी रूग्णालयाकडे धाव घेतली. रूग्णालयाबाहेर मोठा जमाव जमला होता. आत्महत्या मागचे कारण काय? याचा तपास पोलीस घेत असल्याचे सांगणयात आले.