Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

भाजप शहराध्यक्ष बियाणी यांची राहत्या घरी आत्महत्या

suicide
Beed , मंगळवार, 11 ऑक्टोबर 2022 (14:00 IST)
बीडमधून धक्कादायक बातमी समोर आली आहे. बीड भाजप शहराध्यक्षांनी आज सकाळी त्यांनी आपल्या राहत्या घरीच स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केल्याचे वृत्त समोर आले आहे. बियाणीचे समर्थक आणि भाजपच्या कार्यकर्त्यांनी तातडीने त्यांच्या घराकडे धाव घेतली. 
 
या आत्महत्येचे कारण अद्याप समजले नाही. घटनास्थळाचा पंचनामा केल्यानंतर बियाणी यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आला आहे. मात्र, बियाणी यांनी इतक्या टोकाचे पाऊल का उचलले, स्वत: वर गोळी झाडून बियाणी यांनी आत्महत्या का केली, याबद्दल अद्याप कोणतीही माहिती समोर येऊ शकली नाही. याचा सध्या तपास सुरू आहे. 

Edited by : Smita Joshi

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

If mobile is lost मोबाईल हरवल्यास काय करावे