Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

जिल्हा परिषद अध्यक्षपदाच्या निवडणुकीत भाजपच नं. 1

जिल्हा परिषद अध्यक्षपदाच्या निवडणुकीत भाजपच नं. 1
मुंबई- राज्यात झालेल्या पंचवीस जिल्हा परिषदांच्या अध्यक्षपदांच्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने सर्वाधिक दहा अध्यक्षपदे जिंकून पहिला क्रमांक पटकावला आहे.
 
भाजपच्या जिल्हा परिषद सदस्यांनी जळगाव, सांगली, कोल्हापूर, बुलडाणा, वर्धा, चंद्रपूर, गडचिरोली, बीड व लातूर या नऊ जिल्ह्यांच्या जिल्हा परिषदांचे अध्यक्षपद जिंकले. सोलापूर येथे भाजपपुरस्कृत आघाडीचा उमेदवार जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी निवडून आला.
 
नाशिक जिल्हा परिषेदेत शिवसेनेने भाजपला धक्का दिला असला तरी राज्यातील 25 पैकी 10 जिल्हा परिषदांमध्ये भाजपचे कमळ फुलले आहे. 6 ठिकाणी आपले अध्यक्ष बसवून राष्ट्रवादीने दुसरा क्रमांक पटकावला आहे तर 5 जिल्हा परिषदांवर अध्यक्ष बसवून काँग्रेसने तिसरा क्रमांक पटकावला आहे. शिवसेनेला मात्र 4 जिल्हा परिषदांवर भगवा फडवण्याची संधी मिळाली आहे. आधी महापालिका आणि आता जिल्हा परिषदांमध्येही भाजपच सर्वात मोठा पक्ष म्हणून समोर आला आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

राम मंदिर प्रश्नी मध्यस्थीस केंद्राची तयारी