Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

Rajendra Patni Passed Away: भाजप आमदार राजेंद्र पाटणी यांचं निधन

rajendra patani
, शुक्रवार, 23 फेब्रुवारी 2024 (11:38 IST)
Photo - social media
वाशीम जिल्ह्यातील कारंजा विधानसभा मतदारसंघाचे भाजपचे आमदार राजेंद्र पाटणी यांचे वयाच्या 59 व्या वर्षी दीर्घ आजाराने निधन झालं. त्यांच्यावर मुंबई येथे उपचार सुरु असताना त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनावर देवेंद्र फडणवीस यांनी शोक व्यक्त केले आहे.  ते गेल्या तीन वर्षांपासून आजारी होते. त्यांच्या दोन्ही किडण्या निकामी झाल्या होत्या.

आधी ते शिवसेनेत होते नंतर त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला.वाशिम जिल्ह्यातील कारंजा विधानसभा मतदारसंघातून ते भाजपचे आमदार होते.  देवेंद्र फडणवीस यांचे विश्वासू म्हणून त्यांची ओळख होती. पाटणींच्या निधनाने भाजपसह राजकीय वर्तुळाला मोठा हादरा बसला आहे. राजेंद्र पाटणी हे 1997  ते 2003  या काळात शिवसेनेकडून विधान परिषदेवर आमदार होते. त्यानंतर 2004  (शिवसेनेकडून), तर 2014 आणि 2019 मध्ये भाजपकडून असे तीन वेळा कारंजा विधानसभा मतदारसंघातून निवडून आले होते
त्यांच्या निधनानंतर राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पोस्ट लिहून श्रद्धांजली लिहिली आहे. 
 
त्यांनी लिहिले अत्यंत दुःखद बातमी: विधानसभेतील माझे सहकारी राजेंद्र पाटणीजी यांचे आज निधन झाले. गेल्या काही महिन्यांपासून ते आजाराशी झुंज देत होते. ते या संकटातून बाहेर पडतील, अशी आम्हा सर्वांना आशा होती. पण आज त्यांची प्राणज्योत मालवली.ग्रामीण प्रश्नांची जाण असलेला लोकप्रतिनिधी भाजपाने गमावला आहे. पश्चिम विदर्भातील प्रश्न सोडविण्यासाठी त्यांचा कायम पुढाकार असायचा. सिंचनाचे प्रश्न मार्गी लागले पाहिजे, म्हणून ते सतत आग्रही असायचे. त्यांचे निधन ही माझी वैयक्तिक हानी आहे. मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. या दुःखद प्रसंगी त्यांच्या कुटुंबियांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत. हे दुःख सहन करण्याची शक्ती कुटुंबीयांना मिळावी, अशी मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो. ॐ शांती"असे देवेंद्र फडणवीस यांनी लिहून आपली श्रद्धांजली दिली आहे. 

 Edited by - Priya Dixit 
 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

Bhayandar-Vasai Ferry : भाईंदर ते वसई 15 मिनिटांत, रो-रो सेवा सुरू, भाडे आणि वेळ जाणून घ्या