निवडणुका जवळ येत असून प्रत्येक पक्ष नवीन नवीन क्लुप्त्या करत इतर पक्षातील लोकांना आकर्षित करत आहे. आता अहमनगर येथे देखील असाच प्रकार घडला आहे. कॉंग्रेस जेष्ठ नेते राधाकृष्ण विखे पाटील यांना भाजपाकडून चक्क कृषिमंत्री पदाची ऑफर आली आहे.
झाले असे की , विखे पाटील यांनी वक्तव्य केले की आपल्याला आता जुने जतन करावे लागेल, यांच्या या विधानावर युतीच्या काळात तुमच्याकडे कृषि खाते होते. घोडे मैदान जवळच आहे. तुम्ही भाजपातआले तर तुमचे स्वागतच आहे. पुन्हा युतीचीच सत्ता येईल आणि कृषि खाते तुम्हाला मिळेल, असे भाजपा नेते राम शिंदे म्हणाले आहेत.
जिल्हा परिषदच्यावतीने जिल्ह्यातील शेतकऱ्यांना प्रगतशील, गोपालक परस्कार प्रदान केले गेले. त्यावेळी राम कदम बोलत होते, यावेळी माजी कृषिमंत्री बाळासाहेब थोरात, शालिनी विखे, राजश्री घुले, अनुराधा नगवड़े, सभापती अजय फटंगरे आदि उपस्थित होते. त्यामुळे चर्चेचा विषय झाला आहे.