Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

विधान परिषद निवडणुक : महाविकास आघाडी विरुध्द भाजप सामना अटळ

bjp shivsena
, सोमवार, 13 जून 2022 (21:22 IST)
राज्यसभा निवडणुकीनंतर आता विधान परिषद निवडणुकीची रणधुमाळी उडणार आहे. विधान परिषद निवडणुकीच्या रिंगणात महाविकास आघाडीकडून 6 तर भाजपकडून 5 उमेदवार रिंगणात आहेत. विधान परिषदेच्या 20 तारखेला 10 जागांसाठी निवडणूक पार पडणार आहे. या निवडणुकीत पुन्हा महाविकास आघाडी विरुद्ध भाजप सामना रंगणार आहे.
 
विधानसभा बिनविरोध? सदाभाऊ खोत यांचा उमेदवारी अर्ज माघारी
विधानपरिषद निवडणुकीसाठी भाजपने सदाभाऊ खोत यांना उमेदवारी दिली होती तर राष्ट्रवादीकडून शिवाजीराव गर्जे यांनी डमी अर्ज भरला होता. तर कॉंग्रेसनेही चंद्रकांत हंडोरे यांना उमेदवारी घोषित केली होती. परंतु, शेवटच्या क्षणी भाजप व राष्ट्रवादीने अर्ज मागे घेतल्याने निवडणूक बिनविरोध होण्याची आशा होती. परंतु, कॉंग्रेसने उमेदवारी मागे घेण्यास नकार दिला आहे. यामुळे विधानसभेत भाजप विरुध्द महाविकास आघाडी म्हणजेच थेट कॉंग्रेस असा संघर्ष पाहायला मिळणार आहे.
 
भाजपपाठोपाठ राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या उमेदवाराचाही अर्ज मागे
दरम्यान, कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांना नॅशनल हेराल्ड प्रकरणी आज अंमलबजावणी संचालनालयासमोर हजर राहीले आहेत. राहुल गांधी यांच्या समर्थनार्थ देशभरात ईडी कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली. याच पार्श्वभूमीवर विधानसभेत कॉंग्रेस भाजपला आव्हान देण्याच्या तयारीत आहे.
 
विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवार
 
भाजप : प्रवीण दरेकर, राम शिंदे, श्रीकांत भारती, उमा खापरे, प्रशांत लाड
 
राष्ट्रवादी कॉंग्रेस : एकनाथ खडसे, रामराजे निंबाळकर
 
शिवसेना : सचिन अहिर आणि आमशा पाडवी
 
कॉंग्रेस : भाई जगताप आणि चंद्रकांत हंडोरे

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

नाशिक: “त्या” चायनीज खाद्यपदार्थ विक्रेत्याच्या मृत्यूचे गूढ उकलले; धक्कादायक बाबी समोर…