Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

Bogus seed case : वर्ध्यातल्या बोगस बियाणांचं गुजरात कनेक्शन, 10 जणांना अटक

arrest
, शुक्रवार, 16 जून 2023 (13:40 IST)
वर्धा इथे कपाशीची बोगस बियाणे तयार करणाऱ्या कारखान्यावर पोलिसांनी धाड टाकली. या धाडीत कारखान्यात गुजरातमधून आयात केलेले 1 कोटी 55 लाखांचे बोगस बियाणी जप्त करण्यात आले आहे.शहरातील म्हसाळा परिसरात बोगस बियाणे तयार केले जात होते. एकूण 10 आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे.
 
गेल्या काही दिवसांपासून म्हसाळा ग्रामपंचायत अंतर्गत अग्रग्रामी शाळेजवळ अवैध रित्या बोगस बियाणे तयार करण्याचा कारखाना सुरू होता. राजू जैस्वाल यांच्या राहत्या घरी बोगस बियाणे तयार करण्यात येत होते.
 
परिसरात रासायनिक दुर्गंधी पसरल्याने स्थानिकांनी पोलिसात तक्रार दिली. त्यामुळं या बोगस कारखान्याचे बिंग फुटलं. पोलिसांनी मध्य रात्री अचानक या कारखान्यावर धाड टाकली.
 
सदर कारखान्यात बोगस बियाणे निर्मितीचे साहित्य, नामांकित कंपनीचे रॅपर व मार्केटिंगसाठी असलेली वाहने आढळून आली.
 
गुजरात येथील विविध व्यापाऱ्यांकडून 29 क्विंटल बोगस बियाण्याचा माल याठिकाणी आणून पॅकिंग केला जात होता. त्यामधून 14 टन माल शेतकऱ्यांना विकला गेला असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
 
पोलीस अधीक्षक नरुल हसन यांनी माध्यमांना दिलेल्या माहितीनुसार "म्हसळा येथे बोगस बी टी बियाणांचा कारखाना सुरू होता. यावर सेवाग्राम पोलीस आणि लोकल क्राईम ब्रांच मिळून लगेचच छापा टाकण्यात आला. काही आरोपींकडून बोगस बियाणं तयार करण्यात येत होतं. तपासादरम्यान वेगवेगळ्या कृषी केंद्रामार्फत आणि खासगी कृषी केंद्रामार्फत हे बोगस बियाणं विकले जात होते".
 
"सदर बोगस बियाणं गुजरातच्या व्यापाऱ्यांकडून विकत घेतला जात होता. आरोपींनी आतापर्यंत सेलू, नागपूर, वर्धा, यवतमाळ आणि इतर ठिकाणी 14 टन बोगस बियाणांची विक्री केली जात होती. विविध कलमान्वये 15 आरोपींवर गुन्हे दाखल करण्यात आले आहे . या प्रकरणात सेवाग्राम पोलिसांनी 15 पैकी  8 आरोपींना अटक केले.या प्रकरणी अजून दोघांना अटक केली असून आता आरोपींची संख्या 10 झाली आहे. 
 
विदर्भातील जवळपासच्या जिल्ह्यात सगळीकडे या कारखान्यातून विक्री करण्यात आलेली बोगस बियाणांचा माल विकला गेला आहे. बोगस बियाणं विक्री केलेल्या ठिकाणांचा शोध पोलिसांचं पथक घेत आहेत.
या प्रकरणात अजून दोघांना अटक केली असून या मध्ये एका पशुवैद्यकीय डॉक्टराचा समावेश आहे.विजय अरुण बोरकर असे या डॉक्टरचे नाव आहे.  पोलिसांनी मध्यरात्री ही कारवाई केली असून सुमारे दीड कोटींरुपयांचे बोगस बियाणे आढळून आले. आरोपी डॉक्टर पशूंचा डॉक्टर असून पशूंचे उपचारासाठी घरोघरी जात असून बोगस बियाण्याची पाकिटे नेत असून विक्री करायचा.पोलिसांनी त्याला अटक केली असून त्याने गुन्हा कबूल केला आहे. . 
तर यवतमाळ जिल्ह्यातून एकाला अजून अटक केली असून मेहमूद गफ्फार चौहान असे त्याचे नाव आहे. पोलिसांनी 10 आरोपींना अटक केली असून  त्यांना न्यायालयात हजर केले. न्यायालयाने या आरोपींना सात दिवसांची कोठडी सुनावली आहे. 
 
 
 
Edited by - Priya Dixit  

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

इंदुरीकर महाराजांविरोधात गुन्हा दाखल करण्याचे औरंगाबाद खंडपीठाचे आदेश