Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

राहुल नार्वेकर यांच्या विरोधात मुंबई न्यायालयाचे वॉरंट

राहुल नार्वेकर यांच्या विरोधात मुंबई न्यायालयाचे वॉरंट
, शनिवार, 21 जानेवारी 2023 (08:12 IST)
खासदार आणि आमदारांसाठी मुंबई विशेष न्यायालयाने महाराष्ट्राचे सभापती राहुल नार्वेकर  आणि कॅबिनेट मंत्री मंगलप्रभात लोढा  यांच्या विरोधात जामीनपात्र वॉरंट जारी केले आहे. बृहन्मुंबई इलेक्ट्रिक सप्लाय अँड ट्रान्सपोर्ट अंडरटेकिंग (BEST) च्या महाव्यवस्थापकांच्या कार्यालयात काही लोकांनी घुसून त्यांना मारहाण केल्याप्रकरणात आरोपींविरुद्ध आरोप निश्चित करण्यास न्यायालयाला अडचणी येऊ लागल्याने हे पाऊल उचलले गेल्याचे सांगण्यात आले.
 
या प्रकरणात सर्व आरोपी हे भाजपचे आमदार आहेत की मुंबईचे नगरसेवक आहेत याची पडताळणी होऊ न शकल्याने या प्रकरणात नाव असलेले सर्वजण न्यायालयात हजर नव्हते. सभापती राहूल नार्वेकर यांच्या वकिलांनी यासंबंधीची माहीती देताना सांगितले की, “येत्या काळात विधानसभेच्या बैठका सुरू होणार असल्याने ते विधानसभेत व्यस्त आहेत. त्यामुळेच ते येऊ शकले नाहीत. मुंबई विशेष न्यायालयाचे न्यायाधीश रोकडे म्हणाले, याबाबतीत मी काही करू शकत नसल्याचे त्यांनी सांगितले. मी नार्वेकरांना आणि इतरांना याबाबतची पूरी संधी दिली होती. राहूल नार्वेकर आणि मंगलप्रभात लोढा यांच्यासह अनेकजण कोर्टात हजर नव्हते.
 
Edited By- Ratnadeep Ranshoor

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

इयत्ता आठवीच्या विद्यार्थिनीचा शाळेत हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू