Publish Date: Fri, 17 Feb 2017 (14:31 IST)
Updated Date: Fri, 17 Feb 2017 (14:33 IST)
महापालिका निवडणुका जवळ येत आहे. तसे मतदार भुलवण्यासाठी अनेक प्रकार घडतात त्यात मुख्य असते दारू, तसाच प्रकार नाशिक मध्ये घडला आहे. रस्त्यावरून सायरन वाजवत जाणाऱ्या अॅम्ब्युलन्समधून बनावट विदेशी दारूचे बॉक्स जप्त करण्यात आले आहे. राज्य उत्पादन शुल्क विभागाने ही कारवाई केली आहे.त्यामुळे आता हे माफिया कोण कोणते नवीन क्लुप्त्या वापरतील याचा नेम नाही. तर यात अजून विशेष आहे की नाशिक-मुंबई महामार्गावरील इंदिरानगर बायपासजवळ पहाटे 2 वाजता ही घटना घडली आहे . यातून 26 बॉक्स विदेशी दारू जप्त करण्यात आले आहेत.तर त्यांची किमत लाखो रुपये आहे. या .नाशिकचे पालकमंत्री गिरीश महाजन, महापौर अशोक मुर्तडक, जयकुमार रावल यांच्यासोबत शिवेसना, भाजप आणि मनसेच्या नेत्यांचे फोटो अॅम्ब्युलन्सवर आहेत.याप्रकरणी एका जणाला ताब्यात घेण्यात आले आहे.