Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

झोका खेळताना फाशी लागून मुलाचा मृत्यू

झोका खेळताना फाशी लागून मुलाचा मृत्यू
, सोमवार, 21 नोव्हेंबर 2022 (13:05 IST)
झोका खेळणे कोणालाही आवडते. विशेषतः मुलांना झोका खेळणे खूप आवडते. मात्र लहान मुले झोका खेळताना विशेष काळजी घेण्याची गरज असते. अन्यथा काहीही अघटित घडण्याची शक्यता असते. झोका खेळताना फास लागण्याच्या घटना घडतात. असं होऊ नये या साठी मुले झोका खेळत असताना विशेष लक्ष देण्याची गरज आहे. जळगाव मध्ये झोका खेळताना 15 वर्षाच्या मुलाचा फास लागून मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. 
जळगाव जिल्ह्यातील अमळनेर येथे मुंदडा नगर 1 मध्ये झोका खेळताना एका 15 वर्षीय मुलाचा फाशी लागून मृत्यू झाला. वेदांत संदीप पाटील असे या मयत मुलाचे नाव असून तो इयत्ता नववीत शिकायचा. वेदांतचे आई आणि वडील दोघेही शिक्षक आहे. 
 
या घटनेनंतर त्याला तातडीनं रुग्णालयात नेण्यात आले. त्यापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. पोलिसांनी मृत वेदांतच्या शवाला शवविच्छेदनासाठी पाठविले आहे. या घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली आहे. 

Edited By- Priya Dixit

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

Odisha Train Accident: ओडिशात मालगाडीचे डबे रुळावरून घसरून रेल्वे स्थानकावर आदळले दोघांचा मृत्यू