Marathi Biodata Maker

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
Friday, 2 May 2025
webdunia

ढोकळा खाऊन नववधूचा लग्नापूर्वीच मृत्यू

Chhindwara
, शनिवार, 22 ऑक्टोबर 2022 (14:47 IST)
छिंदवाडा येथे एक धक्कादायक घटना समोर आली आहे. येथे हळदीच्या दिवशी ढोकळा खाल्ल्याने एका नववधूचा मृत्यू झाला. यादरम्यान तिला अचानक ठसका लागला आणि ढोकळा तिच्या घशात अडकला. तिच्या कुटुंबीयांनी तिला पाणी दिले. मात्र त्याची प्रकृती अधिकच बिघडली. कुटुंबीयांनी तिला रुग्णालयात नेले असता उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. या घटनेनंतर संपूर्ण कुटुंबाला धक्का बसला आहे.मेघना काळे असे या मयत नववधूचे नाव आहे. 
  
लग्न म्हटलं की घरात आनंदाच  उत्साहाचं वातावरण असत. एखाद्या मुलीचा किंवा मुलाचा आयुष्यात वेगळे वळण घेणारा हा क्षण असतो. आपल्या नव्या संसारात पाऊल टाकण्याचं स्वपन असतात. मुलीचा आणि मुलाचा आयुष्यात स्वतःचा लग्न सोहोळा विशेष असतो. घरात लग्नाची लगबग सुरु असते. मध्यप्रदेशात छिंदवाड्याच्या गावात लग्नाच्या घरात शोक पसरला. घरात लगाची तयारी सुरु असता. हळदीच्या दिवशी नाश्त्यात नववधूने खाललेला ढोकळा तिच्या मृत्यूला कारणीभूत ठरला. नववधू मेघना काळे हिने मुंबईतून एमबीबीएस च शिक्षण पूर्ण केलं असून मुंबईतच ती डॉक्टर म्हणून प्रॅक्टिस करत असे. लग्नासाठी ती छिंदवाडा गावात आली होती आणि हळदीच्या दिवशी तिने खललेला ढोकळा घशात अडकला आणि तिचा दुर्देवी मृत्यू झाला. या घटनेमुळे तिच्या कुटुंबियांना मोठा धक्का बसला असून गावात शोककळा पसरली आहे. 
 Edited By - Priya Dixit 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

सीरमने फेकून दिले कोव्हिडच्या लशींचे 10 कोटी डोस