Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

बीएससीला आयुध गोठवण्याचा अधिकार नाही : फडणवीस

बीएससीला आयुध गोठवण्याचा अधिकार नाही : फडणवीस
, सोमवार, 5 जुलै 2021 (15:57 IST)
संसदीय आयुध गोठवण्याचे काम कोणत्याही विधानसभेने केले नाही असा मुद्दा विरोधी पक्षनेता देवेंद्र फडणवीस यांनी अधिवेशनाच्या कामकाजाच्या सुरूवातीलाच उपस्थित केला. सरकारने सरसकट आयुध गोठवून टाकले, आपण ६१ व्या वर्षी मागे चाललोय की पुढे चाललोय असेही फडणवीस यावेळी म्हणाले. बीएससीला आयुध गोठवण्याचा अधिकार नाही, लोकशाहीला कुलूप लावण्याचा हा प्रकार आहे. व्यपगत केलेले प्रश्न अतारांकित करावेत आणि आयुध वापरण्याचा अधिकार द्यावा अशीही विनंती त्यांनी सभागृहात केली.  
 
अनिल देशमुख यांना जेलमध्ये पाठवण्याची धमकी देता का ?असा सवाल नाना पटोले यांनी उपस्थित केला. त्यानंतर नवाब मलिक यांनी हा मुद्दा रेकॉर्डवरून काढून टाका असे सुचवले.त्याआधी देवेंद्र फडणवीस यांनी भास्कर जाधव यांना डिवचत म्हटले होते की, भास्कर जाधव खूपच अस्वस्थ आहेत. मुख्यमंत्र्यांनी त्यांना महत्वाचे पद द्यावे किंवा एखादे मंत्रीपद द्यावे.त्यानंतर बोलताना मुनगंटीवार यांनी सांगितले की सरकारची चमचेगिरी भास्कर जाधव यांनी करू नये. मधे बोलू नये नाही तर अनिल देशमुख यांच्यासारखे जेलमध्ये जावे लागेल असा चिमटा मुनगंटीवार यांनी लगावला.

त्यावर नाना पटोले यांनी हरकत घेत धमकी देत आहात का ?असा सवाल यावेळी केला. या मुद्यावर भास्कर जाधव यांनीही मला संरक्षण मिळावे.भाजपकडून सगळ्या यंत्रणा वापरून घाबरवण्याचा प्रकार सुरू आहे.ईडी,एनआयए, सीबीआय यासारख्या अनेक यंत्रणांचा वापर करत भाजपकडून हा प्रकार सुरू आहे. त्यामुळेच मला या प्रकरणात संरक्षण द्यावे अशी मागणी भास्कर जाधव यांनी केली.
 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

40% पर्यंत स्वस्त झाले हे स्मार्टफोन्स