Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

भाजपा जैन प्रकोष्ठच्या वतीने कर्करोग मुक्त महाराष्ट्र अभियान

भाजपा जैन प्रकोष्ठच्या वतीने कर्करोग मुक्त महाराष्ट्र अभियान
, शनिवार, 22 जानेवारी 2022 (08:41 IST)
भारतीय जनता पार्टी प्रदेश जैन प्रकोष्ठच्या वतीने  75 व्या स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घोषित केलेल्या स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव कार्यक्रमाअंतर्गत २६ जानेवारी  ते १५ ऑगस्ट २०२२  या काळात  "कर्करोग  मुक्त महाराष्ट्र अभियान" हा विशेष उपक्रम राबविण्यात येणार आहे, अशी माहिती प्रदेश भाजपा उपाध्यक्ष माधव भांडारी आणि जैन प्रकोष्ठचे प्रदेश संयोजक संदीप भंडारी यांनी शुक्रवारी दिली.  भाजपा प्रदेश कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. जैन महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष ललित गांधी यावेळी उपस्थित होते. या अभियानाचा प्रारंभ ४ फेब्रुवारी रोजी भाजपा प्रदेश कार्यालयात विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस, भाजपा प्रदेशाध्यक्ष आ. चंद्रकांतदादा पाटील, केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री भारती पवार,  विधान परिषद विरोधी पक्ष नेते प्रवीण दरेकर यांच्या उपस्थितीत करण्यात येणार आहे.      
 
श्री. भांडारी यांनी सांगितले की,अखिल भारतीय जैन अल्पसंख्याक महासंघाच्या अत्याधुनिक मोबाइल कॅन्सर डिटेक्शन बसच्या माध्यमातून राज्यात १३१ कर्करोग  तपासणी शिबिरांचे आयोजन करण्यात येणार आहे. या शिबिरांतून १०हजारांहून अधिक नागरिकांच्या मोफत  कर्करोग तपासणीचे उद्दिष्ट ठेवले आहे. स्तनाचा कर्करोग, गर्भाशयाचा कर्करोग, तोंडाचा कर्करोग आदि तपासण्या होणार आहेत.
 
 "कॅन्सर जागरूकता अभियान" अंतर्गत राज्यभरात "कर्करोग जागरूकता रॅली", शाळा-कॉलेजमध्ये कर्करोग विषयक व्याख्याने  आयोजित करुन १ लाख लक्ष नागरिकांपर्यंत पोहचण्याचे उद्दिष्ट असल्याचे श्री. संदीप भंडारी यांनी नमूद केले.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

दरोडा टाकणारा ३८ वर्षांनी गजाआड