Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
Tuesday, 1 April 2025
webdunia

सावधान: क्रेडीट कार्ड धारकाला हे आमिष दाखवून तब्बल ४० हजार रुपयांची फसवणूक

Caution: Fraud of Rs 40
, शनिवार, 16 ऑक्टोबर 2021 (16:20 IST)
सायबर क्राईमच्या प्रकारात वाढ झाली असून आता हे गुन्हेगार वेगळ्या पद्धतीने फसवणूक करत आहेत.एका क्रेडिट कार्डधारक ग्राहकाला लिमिट वाढवून देण्याचे आमिष दाखवत ४० हजारांना ऑनलाइन गंडा घातला आहे.याप्रकरणी आडगाव पोलिस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेली माहिती आणि भाऊसाहेब आव्हाड रा. श्रीरामनगर, आडगाव यांनी दिलेल्या तक्रारीनुसार अनोळखी नंबरहून फोन आला. एसबीआय बँकेतून बोलत असल्याचे सांगत कार्डचे लिमिट वाढवण्याचे सांगितले. कार्डची माहिती घेतली मोबाइलवर आलेला ओटीपी नंबर दिल्यानंतर ४०,००० रुपये काढून घेतल्याची तक्रार आव्हाड यांनी दिली. वरिष्ठ निरीक्षक इरफान शेख यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

कळव्यात NCP शिवसेना अमोर समोर : राष्ट्रवादीचे बॅनर फाडण्यात आले, आव्हाडांनी इशारा दिला