Marathi Biodata Maker

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

गुढीपाडवा साधेपणाने साजरा करा, सरकारच्या मार्गदर्शक सूचना

Celebrate Gudipadva
गुढीपाडवा सणानिमित्त महाराष्ट्र सरकारच्या मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. यानुसार सकाळी 7 ते रात्री 8 या वेळेतच लोकांनी साधेपणाने आणि एकत्र न येता सण साजरा करावा, अशी सूचना सरकारने केली आहे.
 
गुढीपाडव्यानिमित्त यंदा पालखी, दिंडी, प्रभात फेरी, बाईक रॅली व मिरवणुका काढू नयेत, सार्वजनिक कार्यक्रमांचे आयोजन करु नये. सार्वजनिक ठिकाणी 5 पेक्षा जास्त लोक जमा न होता सामाजिक अंतर व मास्क, सॅनिटायजरचा वापर करुन घरगुती गुढी उभारुन साधेपणाने सण साजरा करावा  अशी सूचना केली आहे.
 
गुढीपाडवा या सणाच्या दिवशी कोविड-19 प्रतिबंधक उपायांचा अवलंब करुन स्थानिक प्रशासनाच्या पूर्वपरवानगीने आरोग्य उपक्रम/ रक्तदान शिबिरे/ स्वच्छताविषयक जागरुकता आदी उपक्रमांचे आयोजन करता येईल असे आदेशात म्हटले आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

आता हाय रिस्क आणि लो रिस्क मधील नातेवाईकांचा शोध आणि चौकशी