Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

ग्रामीण भागातील नेतृत्व हरपले-छगन भुजबळ

ग्रामीण भागातील नेतृत्व हरपले-छगन भुजबळ
, गुरूवार, 31 मे 2018 (15:03 IST)

राज्याचे कृषीमंत्री भाजपचे ज्येष्ठ नेते पांडुरंग फुंडकर यांच्या अकाली निधनामुळे शेतीच्या प्रश्नांची जाण असलेले ग्रामीण भागातील नेतृत्व कायमचे हरपले असल्याच्या शोक भावना माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी शोक संदेशात व्यक्त केल्या आहे.

 
छगन भुजबळ यांनी शोकसंदेशात म्हटले आहे की, राज्याच्या कृषी मंत्री पदाची धुरा संभाळणारे पांडुरंग फुंडकर यांचे वयाच्या ६७ व्या वर्षी हृदयविकाराच्या धक्क्याने अचानकपणे अकाली निधन मनाला चटका लावणारे आहे. महाराष्ट्रात भाजपा पक्ष वाढवण्यासाठी पांडुरंग फुंडकर यांचं मोठं योगदान आहे. स्व.गोपीनाथ मुंडेंसोबत त्यांनी महाराष्ट्राच्या ग्रामीण भागात भाजपचा प्रचार आणि प्रसार केला.
 
शांत, संयमी व मनमिळावू स्वभावाच्या पांडुरंग फुंडकर यांच्या अकाली निधनाने महाराष्ट्राच्या राजकारणातील शेती व सहकाराच्या प्रश्नाची जाण असलेला एक लोकनेता कायमचा हरपला आहे. त्यांच्या निधनामुळे फुंडकर कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. मी व माझे कुटुंबिय फुंडकर कुटुंबियांच्या दु:खात सहभागी असून ईश्वर मृताच्या आत्म्यास चिरशांती देवो ही प्राथना करतो. असे भुजबळ यांनी आपल्या शोक संदेशात म्हटले आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

पालघर मध्ये भाजपा विजयी, शिवसेनेला धक्का